घरताज्या घडामोडीतीन टोळ्यांमधील आठ सराईत गुन्हेगार तडीपार

तीन टोळ्यांमधील आठ सराईत गुन्हेगार तडीपार

Subscribe

नाशिक शहरातील सार्वजनिक शांततेला बाधा पोहचविणार्‍या तीन टोळ्यांतील आठ सराईत गुंडांना हद्दपार करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी दिली. तडीपार केलेल्या गुंडांवर वारंवार गुन्हे करणे, नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, शांततेचा भंग करणार्‍या गुंडांची हद्दपारी करत त्यांना जिल्ह्याबाहेर स्थानबद्धतेची कारवाई आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

नाशिकरोड, उपनगर व अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा शेख, मयुर बेद व मोबीन तन्वीर कादरी यांच्या टोळ्यांतील गुंडांवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. या टोळ्यांमधील आठ गुंडांना तडीपार करण्यात आले आहे. नाशिकरोड भागातील नवाज उर्फ बाबा बब्बू शेख याच्या टोळीतील अक्षय बाळु धुमाळ(२३, रा. अरिंगळे मळा), मोसिन युसुफ पठाण (२६,रा. सादीक नगर, वडाळागाव), शुभम ज्ञानेश्वर सुर्यवंशी (२०, रा. देवळालीगाव, राजवाडा नाशिकरोड), उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मयुर चमन बेद(३१) संजय उर्फ मॉडेल चमन बेद(३३), रोहित उर्फ माथ्या गोविंद महाले (रा. फर्नांडीसवाडी, नाशिकरोड) तर अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोबीन तन्वीर कादरी, गौरव उमेश पाटील (रा. उपेन्द्रनगर, सिडको) यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे उपायुक्त खरात यांनी शहर व ग्रामीण जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारीत केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -