घरताज्या घडामोडीcruise drug bust: क्रूझ ड्रग्ज पार्टीमध्ये काशिफ खानने आमंत्रित केल होतं, अस्लम...

cruise drug bust: क्रूझ ड्रग्ज पार्टीमध्ये काशिफ खानने आमंत्रित केल होतं, अस्लम शेख यांची स्पष्टोक्ती

Subscribe

कॉर्डेलिया क्रूझवरील पार्टीसाठी मला आमंत्रित करण्यात आले होते अशी स्पष्टोक्ती मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी दिली आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने कारवाई करत अनेकांना अटक केली यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. या पार्टीला काँग्रेस नेते अस्लम शेख यांना आमंत्रित करण्यात आले होते असा नवाब मलिक यांनी सांगितले होते. यावर अस्लम शेख यांनी स्वतः स्पष्टीकरण देत आपल्याला आमंत्रण आलं असल्याचे कबुल केलं आहे. काशिफ खान या व्यक्तीने आपल्याला आमंत्रित केलं होते मात्र त्याला मी ओळखत नाही असेही अस्लम शेख म्हणाले.

क्रूझ ड्रग्ज पार्टीमध्ये मुंबई पालमकंत्री अस्लम शेख यांना आमंत्रित करण्यात आले होते. अशा चर्चा सुरु होत्या यावर अनेक माध्यमांनी अस्लम शेख यांना प्रश्नही केला होता. अखेर अस्लम शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला या पार्टीला बोलवले होते हे मान्य केलं आहे. अस्लम शेख म्हणाले की, मला या पार्टीमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. मुंबईचा पालमंत्री असल्यामुळे मला बोलवण्यात आले असेल. परंतु काशिफ खान नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. कुठेतरी भेट झाली असावी तेव्हा त्याने आमंत्रित केलं असावं असे अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी माध्यमांशी संवाद साधताना क्रूझ ड्रग्ज पार्टीविषयी वक्तव्य केलं आहे. अस्लम शेख म्हणाले की, महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न करण्यात येत आहेत. शपथविधी झाल्यापासून भाजपकडून महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी आणि सरकारची बदनामी करण्यासाठी कारस्थान सुरु आहे. शाहरुख खानच्या मुलाच्या प्रकरणात ज्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. ज्यामध्ये नवाब मलिकांनी पुराव्यानुसार महाराष्ट्रासमोर माहिती ठेवली आहे. मलिकांनी सांगितले की, मला सुद्धा क्रूझ ड्रग्ज पार्टीमध्ये आमंत्रित कऱण्यात आले होते. काशिफ खान नावाच्या व्यक्तीने या पार्टीमध्ये आमंत्रित केलं होते. पंरतु त्याला मी ओळखत नाही. मुंबई शहराचा पालकमंत्री असल्यामुळे लग्न सोहळा, दुकानांचे उद्घाटन अशा अनेक शुभारंभासाठी मला नेहमी आमंत्रित करण्यात येते. तसेच हे आमंत्रण होते असे अस्लम शेख म्हणाले.

काशिफ खानने फोन करुन संपर्क साधला का असा प्रश्न अस्लम शेख यांना विचारण्यात आला यावर त्यांनी सांगितले की, माझा मोबाईल नंबर काशिफ खानकडे आहे की नाही याबाबत माहिती नाही. परंतु माझा मोबाईल हा जास्तीत जास्त वेळ पीएकडे असतो. काशिफने मला बोलवलं होते. एका ठिकाणी बोलवल्यावर आमंत्रित केलं होते. त्या ठिकाणी तो कसा आला ते माहिती नाही परंतु सगळे मला आमंत्रण देतात तसेच हे आमंत्रण दिले असल्याचेही अस्लम शेख म्हणाले.

- Advertisement -

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणातील सर्व पुरावे समोर आणले आहेत. त्या पुराव्यानुसार केंद्रीय तपास यंत्रणा तपास करतील असेही अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : क्रांती रेडकरशी विवाह २०१७ मध्ये’ त्या प्रकरणाशी संबंध कसा? वानखेडेंचा मलिकांच्या आरोपांवर सवाल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -