घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांनी वॉर रुममध्ये उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेण्याची गरज - प्रवीण दरेकर

मुख्यमंत्र्यांनी वॉर रुममध्ये उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेण्याची गरज – प्रवीण दरेकर

Subscribe

मंत्रालयात अधिकारी, सचिव, यंत्रणा सारी मंडळी प्रत्यक्षात कार्यरत करण्यात सोपी पडते

अरबी समुद्रात तयार झालेले तौत्के चक्रीवादळ महाराष्ट्रावर घोंगावत आहे. मुंबई, ठाण्यात सकाळपासून मुसळधार पाऊस आणि वादळी वारे सुटले आहे. या वाऱ्याच्या तडाख्यामुळे अनेक झाले उन्मळून पडली आहे. महाराष्ट्रात या वादळामुळे काही जागी जिवितहानी आणि नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन वॉर रुम आणि कंट्रोल रुममध्ये थांबून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री बाहेर येत नसल्यामुळे कामात अभाव दिसून येत असल्याचे मत दरेकरांनी व्यक्त केले आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता वॉर रुम आणि कंट्रोल रुमध्ये थांबून महाराष्ट्राच्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्दैवाने गेले अनेक महिने कोरोना असू किंवा इतर संकट आल्यावर मुख्यमंत्री मंत्रालयात येतच नाहीत. त्यामुळे नियोजन आणि नियंत्रणासाठी त्याठिकाणी योग्य ठरत नाही. मंत्रालयात अधिकारी, सचिव, यंत्रणा सारी मंडळी प्रत्यक्षात कार्यरत करण्यात सोपी पडते परंतु मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर न येता व्हिडिओ कॉन्फरंन्सवर कारभार चालवण्यात धन्यता मानतात त्यामुळे निश्चितपणे कामात गती कमी होते आणि समन्वयाचा अभाव दिसून येतोय असे दरेकरांनी ट्विट करत म्हटले आहे.

- Advertisement -

व्हेंटिलेटर खासगी रुग्णांना कशी दिली

मागील काही दिवसांपासून पीएम केअर फंडातून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरवरुन राजकारण तापले होते. हे व्हेंटिलेटर्स निकृष्ठ असल्याचे महाविकास आघाडीतील नेत्यांनी आणि डॉक्टरांनी म्हटले होते. या व्हेंटिलेटरचे केंद्र सरकारकडून ऑडिट करण्यात आले आहे. प्रवीण दरेकरांनी यावर प्रतिक्रिया देताना राज्यात कोरोनाच्या संकटात ‘पीएम केअर फंडा’तून महाराष्ट्राला व्हेंटिलेटर देण्यात आले आहे. मात्र, ही देण्यात आलेले व्हेंटिलेटर केवळ सरकारी रुग्णालयाला देण्याचे सांगण्यात आले होते. परंतु, सांगून देखील हे व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना कशी देण्यात आली, असा सवाल विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राला चक्रीवादळाचा तडाखा

महाराष्ट्रात चक्रीवादळामुळे हवामाना विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला होता. मुंबई, ठाणे, रायगड,सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मुंबईत पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे तर रस्त्यावरील झाडे उन्मळून पडल्याने अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. मुंबई समुद्र किनारपट्टीवर सर्व सरकारी यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले आहे. एनडीआरएफचे पथकेही तैनात करण्यात आली आहेत. रायगडमध्ये चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ८ हजार पेक्षा अधिक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. जोरदार वाऱ्यामुळे रायगडमध्येही झाडे उन्मळून गेली आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -