घरक्राइमAbhishek Ghosalkar Murder Inside Story: मॉरिसने तुरुंगात रचला अभिषेक यांच्या हत्येचा कट?

Abhishek Ghosalkar Murder Inside Story: मॉरिसने तुरुंगात रचला अभिषेक यांच्या हत्येचा कट?

Subscribe

मुंबई – मुंबईतील दहिसरचे माजी नगरसेवक शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकरांची 8 फेब्रुवारीला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा या गुंडाने आणि स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याने अभिषेक घोसाळकरांना स्वतःच्या ऑफिसमध्ये बोलावून त्यांच्यासोबत फेसबुक लाइव्ह केले. फेसबुक लाइव्ह संपत असतानाच मॉरिसने अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करुन त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केली. उल्हासनगर पाठोपाठ दहिसरमध्ये झालेल्या गोळीबाराने मुंबई हादरली आहे. अभिषेक घोसाळकर हत्ये प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मॉरिसच्या पत्नीचा जबाब नोंदवला आहे. त्यातून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. मॉरिस पाच महिने येरवाडा तुरुंगात होता, तेव्हाच त्याने अभिषेक यांच्या हत्येचा कट रचल्याचे समजते.

मुंबई पोलिसांनी अभिषेक घोसाळकर हत्ये प्रकरणी शुक्रवारी मॉरिसचा स्वीय सहाय्यक मेहुल पारीख, रोहित साहू आणि त्याच्या बॉडीगार्डला ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

‘अभिषेक घोसाळकरांना सोडणार नाही’

मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांच्यात दीड वर्षांपर्वी मोठा वाद झाला होता. 48 वर्षीय महिलेवर बलात्कार, 80 लाखांची फसवणूक आणि विनयभंग प्रकरणी मॉरिसवर गुन्हा दाखल झाला आणि त्याला पाच महिन्यांचा तुरुंगवास झाला होता. या सगळ्यामागे अभिषेक घोसाळकर असल्याचा आरोप मॉरिसचा होता. या रागातूनच तो अभिषेक घोसाळकरांना सोडणार नाही, असे घरात नेहमी बोलत असायचा असे त्याच्या पत्नीने शुक्रवारी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

दहिसरचे ‘बदला’पूर

मॉरिसच्या मनात अभिषेक घोसाळकरांचा बदला घेण्याचे मनसुबे अनेक महिन्यांपासून सुरु होते. तो नुकताच लॉस एंजल्सला जाऊन आला होता. त्याची दहिसरमध्ये नगरसेवक होण्याची महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी तो प्रत्येक पक्षातील नेत्यांसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. अनेक नेत्यांना शुभेच्छा, स्वागताचे बॅनर त्याने दहिसर परिसरात वेळोवेळी लावले होते. आठ दिवसांपूर्वीच त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ‘वर्षा’वर भेट देखील घेतली. त्याचे फोटो संजय राऊत यांनी ट्विट केले आहेत. मॉरिसची महापालिकेत नगरसेवक होण्याची राजकीय महत्त्वाकांक्षा होती, त्यात माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे त्याचे मोठे स्पर्धक होते. त्यासोबतच दीड वर्षांपूर्वीचा दोघांमधील वाद. बलात्कारासारख्या खटल्यात घोसाळकरांनीच अडकवल्याचा त्याच्या मनात राग होता. याच बदल्याच्या भावनेतून मॉरिसने थंड डोक्याने घोसाळकरांना स्वतःच्या ऑफिसमध्ये बोलावून मारण्याची प्लॅनिंग केली असल्याचे त्याच्या पत्नीच्या जबाबातून समोर येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूनंतर करुणा रुग्णालयाबाहरे स्मशान शांतता

गोळीबारातील रिव्हॉल्व्हर कोणाची?

अभिषेक घोसाळकरांवर मॉरिसने पाच गोळ्या झाडल्या. त्यातील तीन त्यांना लागल्या. मॉरिसेने हत्येसाठी वापरलेलं रिव्हॉल्व्हर हे त्याच्या मालकीचे नव्हते असे चौकशीत समोर आले आहे. त्याचा बॉडी गार्ड असलेल्या शर्माकडे त्या रिव्हॉल्व्हरचे लायसन्स आहे. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मॉरिसच्या पत्नीकडून आणखी खुलासा होण्याची शक्यता 

क्राइम ब्रँच यूनिट 11 टीमने मॉरिसच्या पत्नीचा जबाब नोंदवला आहे. प्राथमिक चौकशीत तिने दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार आणि विनयंभगाच्या गुन्ह्यात त्याला पाच महिने येरवाडा तुरुंगात टाकण्यात आले होते. हे घडवून आणण्यामागे अभिषेक घोसाळकर असल्याचा त्याचा समज होता. तुरुंगातून बाहेर आल्यापासून तो अभिषेक घोसाळकरांना सोडणार नाही, त्याला संपवणारच असे नेहमी म्हणत असायचा असे त्याच्या पत्नी जबाबात सांगितले.
मॉरिसच्या पत्नीचा जबाब अजून पूर्ण झालेला नाही. तिला आणखी चौकशीला बोलावले जाऊ शकते. तसेच मॉरिसचा पीएसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीत आणखी काय माहिती समोर येते, ते पाहावे लागले. हत्येचे नेमके कारण काय आहे, याची क्राइम ब्रँच चौकशी करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -