घरमहाराष्ट्रSanjay Raut : "गृहमंत्र्यांना सांगा तुमचे कुत्र्याचे पिल्लू मेले", राऊतांनी फडणवीसांना 'त्या'...

Sanjay Raut : “गृहमंत्र्यांना सांगा तुमचे कुत्र्याचे पिल्लू मेले”, राऊतांनी फडणवीसांना ‘त्या’ वक्तव्यावरून घेरले

Subscribe

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही फडणवीसांना त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सुनावले आहे.

मुंबई : मृत पावलेले लोक कुत्र्याचे पिल्लू आहेत? ही कोणती भाषा आहे? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले. राऊतांनी फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर आक्षेपही घेतला आहे. ठाकरे गटाचे दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी (ता. 08 फेब्रुवारी) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. विरोधकांच्या या मागणीबाबत बोलताना फडणवीसांनी धक्कादायक वक्तव्य केले होते.

हेही वाचा… Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांबद्दल राऊतांचे अपशब्द; ‘राज्य XXच्या हातात आहे, त्यामुळे गुंड फोफावले’

- Advertisement -

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याबाबत संजय राऊत यांना प्रसार माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, गृहमंत्री फडणवीसांच्या लेखी अभिषेक घोसाळकर हा कुत्र्याचे पिल्लू होता का? अभिषेक घोसाळकर हा शिवसेनेचा तरुण कार्यकर्ता होता. त्याला भाजपाशी संबंधित असलेल्या मॉरिस नोरोन्हाने गोळ्या झाडून मारले. अभिषेक घोसाळकर यांच्या वडिलांचा, पत्नीचा आणि लहान मुलीचा आक्रोश देवेंद्र फडणवीसांना विचलित करत नाही का? हल्ल्यात मरणारी लोक कुत्र्याची पिल्ले आहेत का? देवेंद्र फडणवीस ही कोणती भाषा वापरत आहेत, असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.

तर, फडणवीसांना घेरत राऊत म्हणाले की, तुम्ही दिल्लीला जाऊन शेपूट हलवता आणि इकडे येऊन आमच्यावर भुंकता. सरकार बदलल्यानंतर या सगळ्याचा हिशेब होईल. याचवेळी त्यांनी चाळीसगावचे नगरसेवक महेंद्र मोरे यांच्या हत्येबाबत म्हटले की, त्यांच्याही नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, मग ते सुद्धा कुत्र्याचे पिल्लू होते का? असे म्हणत राऊतांनी संताप व्यक्त केला.

- Advertisement -

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी गृहमंत्री असलेल्या फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर फडणवीसांनी म्हटले होते की, उद्या एखाद्या गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधी पक्ष गृहमंत्र्याचा राजीनामा मागतील. मग अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूसारख्या गंभीर प्रकरणात विरोधी पक्षांनी माझा राजीनामा मागितला असेल, तर मला त्यामध्ये फारसे विशेष असे काही वाटत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -