घरमहाराष्ट्रदिवसभरातील घडामोडी

दिवसभरातील घडामोडी

Subscribe

सकाळी ८.२९ वाजता : शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा. ट्वीटरवरून दिली माहिती.
सकाळी ८.४९ वाजता : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, अहमद पटेल यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा, राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली.
सकाळी ९.३० वाजता : काँग्रेस, राष्ट्रवादीचा कसोटीचा काळ- शिवसेना नेते संजय राऊत यांचे पत्रकार परिषदेत आवाहन.
सकाळी ९. ४० वाजता : संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओक या निवास स्थानी रवाना.
सकाळी ९.४५ वाजता : शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत आमचा निर्णय अद्याप झालेला नाही; प्रफुल्ल पाटील यांनी ठेवला सस्पेन्स कायम.
सकाळी ९.५३ वाजता : अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला त्याबाबत मला माहिती नाही, आम्हाला काही सेनेकडून प्रस्ताव नाही. आमची बैठक होतेय, काँग्रेस-राष्ट्रवादी आम्ही ठरवू. आम्ही कुठलीही अट टाकलीय हे मला माहिती नाही -शरद पवार
सकाळी १०.०० वाजता : शिवसेना आमदारांची द रिट्रीट हॉटेलमध्ये बैठक. बैठकीला शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे उपस्थित. राज्यपालांना देण्यात येणार्‍या पत्रावर शिवसेनेच्या आमदारांची सही घेतली.
सकाळी १०.१५ वाजता : आपल्या सर्व आमदारांच्या सहीचे पत्र घेऊन एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर मातोश्रीवर रवाना.
सकाळी १०. २० वाजता : राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज काय हे राज ठाकरेंनी सांगितले होते. आता तर सगळेच पक्ष विरोधी पक्षात बसायला तयार झाले -मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांचा टोला.
सकाळी १०.४८ वाजता : दिल्लीत काँग्रेस कार्यकारणीची बैठक, मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल उपस्थित, शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत चर्चा.
सकाळी ११.२८ वाजता : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर भाजपच्या कोअर समितीची बैठक, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, सुरेश घस यांच्यासह अनेक नेते उपस्थित.
दुपारी १२. १८ वाजता : काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली. महाराष्ट्राच्या निर्णयावर चर्चा झाली. चार वाजता पुन्हा एकदा बैठक होईल -मल्लिकार्जुन खर्गे.
दुपारी १२.२४ वाजता : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या ४४ आमदारांचे पत्र सोनिया गांधींना देणार. सर्व आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार.
दुपारी १२.३० वाजता : काँग्रेसचा निर्णय होईपर्यंत राष्ट्रवादी निर्णय घेणार नाही. पवारसाहेबांनी काँग्रेसला विचारूनच निर्णय घेण्यास सांगितले आहे. शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार नाहीत -नवाब मलिक.
दुपारी १२. ५४ वाजता : राष्ट्रवादी काँग्रेसने मागून घेतला शिवसेनेचा वचननामा. कॉमन मिनिमम प्रोग्रॅम बनवण्यासाठी हालचाल सुरू.
दुपारी १.२९ वाजता : उद्धव ठाकरे यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक. वांद्रे येथील हॉटेल ताज लॅण्ड एण्ड्समध्ये बैठक. सत्तासमीकरणावर २० मिनिटांपासून खलबते.
दुपारी १.३९ वाजता : शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान मोदींकडे पाठवला.
दुपारी १.४८ वाजता : शिवसेना नेते अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या भेटीला. अहमद पटेल यांच्या निवासस्थानी शिवसेना-काँग्रेसची बैठक.
संध्या.४.३१ वाजता : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घरी काँग्रेसची बैठक. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, राजीव सातव, रजनी पाटील उपस्थित.
संध्या. ४.४८ वाजता : शिवसेनेला पाठिंबा देण्यास अजूनही सोनिया गांधींचा नकार, काँग्रेस नेत्यांकडून विनवणी सुरू.
संध्या. ४.५७ वाजता : सोनिया गांधींचा प्रत्येक काँग्रेस आमदाराशी संवाद, आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी प्रत्येकाला फोन.
संध्या. ५.१८ वाजता : उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात सुमारे ७ मिनिटे चर्चा.
संध्या. ५.५५ वाजता : शिवसेना गट नेते एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटायला राजभवनाकडे रवाना.
संध्या. ६.१५ वाजता : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोनिया गांधींशी फोनवरून चर्चा.
संध्या. ७.१० वाजता : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पत्र, मात्र त्यात पाठिंब्याचा उल्लेखही नाही.
संध्या. ७.३४ वाजता : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला पाठिंब्याचे पत्रच आले नसल्याचे उघड
संध्या ७.४० वाजता : आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते राजभवनाबाहेर.
संध्या ७.४५ वाजता : राजभवनात आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस चर्चा करत असल्यामुळे वेळेआधी पाठिंब्याचा निर्णय होऊ शकलेला नाही. मात्र शिवसेनेचा दावा कायम आहे -आदित्य ठाकरे.
संध्या ७.४५ वाजता : सत्तास्थापनेसाठी मुदत वाढवून देण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा नकार. राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता.
संध्या ७.५० वाजता : बैठक संपवून सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानातून महाराष्ट्राचे नेते बाहेर. तीन तासांच्या बैठकीनंतरही शिवसेनेला पाठिंब्याबाबत निर्णय नाही. शरद पवारांशी शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत पुन्हा चर्चा करू -मलिक्कार्जुन खरगे.
संध्या ८.०० वाजता : शिवसेनेला पाठिंब्याबाबत कधी निर्णय होणार हे मी सांगू शकत नाही. मात्र चर्चा आहे – पृथ्वीराज चव्हाण.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -