घरताज्या घडामोडीCorona: चीनच्या विरोधात उभे राहिले जी-७; कोरोनाची उत्पत्ती शोधण्यासाठी WHOचा वाढला दबाव

Corona: चीनच्या विरोधात उभे राहिले जी-७; कोरोनाची उत्पत्ती शोधण्यासाठी WHOचा वाढला दबाव

Subscribe

जगातील शक्तिशाली देशांनी चीनला चारही बाजूंनी घेरण्यास केली सुरुवात

संपूर्ण जगभरात कोरोनाचा कहर कायम असून आतापर्यंत ३८ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या जीवघेण्या विषाणूचा उगम शोधण्यासाठी सध्या धडपड सुरू आहे. सुरुवातीपासून कोरोनाचा उगम चीनमधून झाल्याचे म्हटले जात आहे. परंतु चीन हे मान्य करण्यास तयार नाही आहे. पण यामुळे आता जगातील शक्तिशाली देशांनी चीनला चारही बाजूंनी घेरण्यास सुरुवात केली आहे. जी-७ (Group of Seven) बैठकीत चीनने कोरोनाचे उगमस्थान शोधण्यासाठी मदत करावी, असे सांगण्यात आले आहे. शिवाय चीनला शिंजियांग प्रांतमध्ये मानवाधिकार उल्लंघनासाठी आणि हाँगकाँमधील उच्च स्तरावरील स्वायत्ततेबद्दल फटकारण्यात आले आहे.

कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटेन आणि अमेरिका यांची संघटना जी-७ बैठकीमध्ये या शक्तिशाली देशांच्या नेत्यांनी यावेळी विस्तारित स्वरुपात चर्चा केली की, चीन विरोधात एकीकृत भूमिका कशी घ्यावी. यावर चर्चा केल्यानंतर एक महत्त्वाचा अंतिम आदेश जारी केला. ज्यामध्ये तैवानसह चीनसाठी अत्यंत संवेदनशील काही मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

- Advertisement -

यावेळी जी-७ बैठकीत चीनला सांगितले गेले की, ‘आम्ही चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उगम झाल्याचा शोध करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) माध्यमातून दुसऱ्या टप्प्यात कालबद्ध, पारदर्शी, विशेष तज्ज्ञांच्या नेतृत्वात आणि विज्ञानावर आधारित अभ्यासाची विनंती करतो. ज्याची शिफारस तज्ज्ञांनी आपल्या अहवालात केली आहे.’


हेही वाचा – Coronavirus India Update: दिलासादायक! देशात ९ लाखांहून अधिक रुग्ण सक्रिय; ७२ दिवसांत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक घट


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -