घरताज्या घडामोडीआता तरी ठाकरेंनी..., 'त्या' ट्वीटचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

आता तरी ठाकरेंनी…, ‘त्या’ ट्वीटचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

Subscribe

मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गट यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. बिहारमधील पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक पार पडली. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारकडून त्यांच्या बैठकीवर टीका करण्यात आली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांना उत्तर देत कुटुंब तुम्हालाही असल्याचा सूचक इशारा दिला होता. त्यावर फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ट्वीटचा उल्लेख करत पुन्हा एकदा ठाकरेंवर पलटवार केला आहे.

उद्धव ठाकरेंनी समजून घ्यायला हवं

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंना एका ट्वीटने उत्तर दिलं. त्या ट्वीटला मिळालेल्या पाठिंब्याने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. त्यावरून तरी उद्धव ठाकरेंनी समजून घ्यायला हवं की, लोकांना काय अपेक्षित आहे.

- Advertisement -

सगळीकडेच भाजपात पक्षप्रवेश

- Advertisement -

सगळीकडेच भाजपात पक्षप्रवेश होत आहेत. कारण मोदींच्या नेतृत्वावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. आताच लोकांनी अमेरिकेतील मोदींची भेट बघितली. भारताच्या पंतप्रधानांना अमेरिकेत असं समर्थन मिळणं, हा त्या व्यक्तीचा सन्मान नाही, तर देशाचा सन्मान आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मोदी हे निमित्त आहे. हा मोदींचा सन्मान होत नसून हा भारताचा सन्मान होत आहे. अमेरिकेची भरगच्च संसद मोदींसाठी उभी राहून टाळ्या वाजवते. त्यावेळी भारताचा सन्मान होतो, असंही फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका; सिद्धरामय्या यांचे आवाहन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -