घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरऔरंगजेबच्या नावाने घोषणाबाजीच्या व्हिडीओचे ओवैसींकडून खंडन; म्हणाले...

औरंगजेबच्या नावाने घोषणाबाजीच्या व्हिडीओचे ओवैसींकडून खंडन; म्हणाले…

Subscribe

गेल्या काही दिवसांपूर्वी औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्याने छत्रपती संभाजी नगर शहरात मोठा राडा झाला होता. दोन गटांत दंगलीही झाल्या. मात्र असे असताना एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणात औरंगजेबच्या नावानं घोषणाबाजी झाल्याचा दावा केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी औरंगजेबचे पोस्टर झळकावल्याने छत्रपती संभाजी नगर शहरात मोठा राडा झाला होता. दोन गटांत दंगलीही झाल्या. मात्र असे असताना एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणात औरंगजेबच्या नावानं घोषणाबाजी झाल्याचा दावा केला जात आहे. परंतु, अशाप्रकारची कोणतीही घोषणाबाजी झाली नाही, असे असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले. (Asaduddin Owaisi First Reaction On Aurangazeb Slogans In Rally Buldhana)

एआयएमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे बुलढाणा येथे भाषण झाले. या भाषणात औरंगजेब याच्या नावाने घोषणाबाजी झाल्याचा दावा अनेकांनी केला. औरंगजेबच्या नावाने घोषणाबाजी होत असल्याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या असून, या घोषणाबाजीचा अनेकांनी निषेध केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – औरंग्याच्या घोषणांचा उद्धव ठाकरे निषेध करणार का? बावनकुळेंचा सवाल

या घोषणाबाजीच्या व्हायरल व्हिडीओबाबत असदुद्दीन ओवैसी यांना प्रश्न विचारले असता त्यांनी “तुम्ही किती खोट्या बातम्या पसरवाल? मुस्लिमांचा किती द्वेष कराल? तुम्ही खोट्या बातम्या का चालवत आहात? तुम्ही घोषणा ऐकल्या आहेत का? तिथे पोलीस नव्हते का?” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. दरम्यान, या कथित घोषणाबाजीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अरेरे! ओवैसींसोबत बसण्यासाठी MIM च्याच कार्यकर्त्यांनी एकमेकांवर रोखल्या बंदुका?

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

“मी सातत्याने म्हणतोय की, या औरंग्याच्या औलादी कुठून पैदा झाल्या? महाराष्ट्रात आणि देशात औरंगजेबाचे रक्त कुणामध्येही नाही. या ठिकाणचे मुस्लीमही औरंगजेबाचे वंशज नाहीत. औरंगजेब या देशावर राज्य करण्यासाठी, हिंदुंवर अत्याचार करण्यासाठी, आमच्या माताबहिणींची अब्रु लुटण्यासाठी आला होता. त्यामुळे औरंगजेब कुठल्याही राष्ट्रीय मुसलमानाचा मानक होऊ शकत नाही. त्यामुळे जे अशा घोषणा देत आहेत, त्या औरंग्याच्या औलादी कोण आहेत, त्यामागे कोण आहे, त्यांचा हेतू काय आहे, ते महाराष्ट्रात काय घडवू इच्छित आहेत हे लवकरच बाहेर येईल”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -