घरमहाराष्ट्रधक्कादायक! पत्नीच्या अंत्यसंस्कारावेळी पतीची हत्या

धक्कादायक! पत्नीच्या अंत्यसंस्कारावेळी पतीची हत्या

Subscribe

पतीच्या जाचाला कंटाळून त्या महिलेने आत्महत्येचे पाऊन उचलल्याचा आरोप करत, तिच्या नातेवाईकांनी पतीला बेदम मारहाण केली.

कर्नाटकच्या विजयपूरमधील किलारहट्टी या गावात एक धक्कादायक प्रकर घडला. एका मृत महिलेचे अंत्यसंस्कार सुरु असताना तिच्या नातेवाईकांनी तिच्याच पतीला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये मृत महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. पतीच्या जाचाला कंटाळूनच या महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, पत्नीच्या अंत्यसंस्कारावेळी अशाप्रकारे पतीचाही जीव घेण्याच्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये विविध चर्चा रंगत आहेत.  मृत दामपत्त्य राजू तांबे आणि काजल तांबे विजापूरमधील किलारहट्टी गावचे रहिवासी होते. दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग येथे काजल तांबे हिने स्वत:ला जाळून घेतले. काजलने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, पतीच्या जाचाला कंटाळून काजलने हे पाऊन उचलल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. दोन वर्षांपूर्वी राजू आणि काजल यांचं लग्न झालं होतं. नोकरी शोधण्यासाठी दोघेही विजयपूरहून सिंधुदुर्गमध्ये आले होते. सूत्रांनुसार, त्यांच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाला होता. याविषयी तोडगा काढण्यासाठी दोघांच्या घरच्यांवनी त्यांना अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केली पण परिस्थीती जैसे थे राहिली.

आपल्या वैवाहिक जीवनामुळे त्रस्त असलेल्या काजलने अखेर रविवारी सिंधुदुर्गामध्येत आत्महत्या केली. काजलचा मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर अंतिम संस्कारासाठी तो तिच्या नातेवाईकांच्या घरी नेण्यात आला. त्यावेळी साहाजिकच काजलचा पती राजू तांबेही तिथे हजर होता. काजलचे अंत्यसंस्कार करतेवेळी संतापलेल्या तिच्या नातेवाईकांनी काजलने तुमच्यामुळेच आत्महत्या केली असं म्हणत राजूला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीमध्ये राजू इतका जबर जखमी झाली की त्यातच त्याचा मृत्यू झाला. राजूचा भाऊ संजू तांबेही यावेळी जखमी झाला. दरम्यान, या संपूर्ण घटनेप्रकरणी राजूचे वडील शिवाजी तांबेंनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी लवकरात लवकर मृत काजोलच्या नातेवाईकांवर कारवाई करावी अशी मागणी शिवाजी तांबे यांनी केली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून घेतली असून, ते काजलच्या नातेवाईकांची पुढील चौकशी करत आहेत.


वाचा: भाजपची आश्वासनं, जनतेच्या नशिबी दगडधोंडेही नाहीत – शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -