घरCORONA UPDATECoronaVirus: देशात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या राज्यासह मुंबईत अधिक

CoronaVirus: देशात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या राज्यासह मुंबईत अधिक

Subscribe

सध्या देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्य १० हजारांहून अधिक झाली असून तब्बल ३३९ लोकांना आपले प्राम गमवावे लागले आहेत. त्यातही महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

अखेर देशात लॉकडाऊनचा कालावधी १९ दिवसांसाठी वाढवण्यात आला असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची घोषणा केली. देशात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्य १० हजारांहून अधिक झाली असून तब्बल ३३९ लोकांना आपले प्राम गमवावे लागले आहेत. त्यातही महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाबाधित असून हा आकडा २ हजार ३३४ वर गेला आहे. तसेच १६० लोकांचा मृत्यू आतापर्यंत कोरोनामुळे झाला आहे. यातही मुंबईतील आकडा जास्त असून १०१ रुग्ण हे मुंबईत आहेत. त्यामुळे देशात प्रत्येक पाचवा रुग्ण हा महाराष्ट्राचा असल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा – धक्कादायक! दुधाच्या टँकरमधून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक

- Advertisement -

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दाटीवाटीत राहणाऱ्या लोकवस्त्या आहेत. धारावी, वरळी कोळीवाडा, मानखुर्द, मालवण अशा काही झोपडपट्टी आणि गर्दीच्या परिसरांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. या भागातील संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. प्रामुख्याने आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या धारावीत याची सुरूवात करण्यात आली आहे. येथील तब्बल साडेसात लाख लोकांचे स्क्रिनिंग करण्यात आले असून ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळतील त्यांना त्वरीत हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात आहे.

मुंबईतील जी दक्षिण हा वॉर्ड सर्वात जास्त धोकादायक बनला आहे. या वॉर्डमध्ये वरळी, प्रभादेवी, एलफिन्स्टन हे उच्चभ्रू आणि झोपडपट्टी असलेले विभाग येतात. गेल्या १२ तासांत येथे २८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या वॉर्डमधील रुग्णांची संख्या ३०८ वर गेली आहे. तर इ वॉर्ड म्हणजे भायखळ्यातील रुग्णांची संख्या १२५ वर गेली आहे. त्यात आणखी ५ रुग्णांची भर पडली आहे. तर डी वॉर्ड म्हणजे ग्रँट रोडची रुग्णसंख्या १०७ झाली असून येथे १० रुग्ण वाढले आहे. आज सकाळी धारावीत ६ नवे रुग्ण आढळले असून ४ रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत धारावीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ५५ वर गेली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – टीईटी परीक्षेला बसलेले विद्यार्थी लॉकडाऊनमुळे सवलतीच्या गुणांपासून वंचित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -