घरमहाराष्ट्रराणेंनी संघाचे तत्त्वज्ञान आचारणात आणावे दीपक केसरकर यांचा सल्ला

राणेंनी संघाचे तत्त्वज्ञान आचारणात आणावे दीपक केसरकर यांचा सल्ला

Subscribe

नारायण राणे योग्य पक्षात गेलेत. संघाची विचारधारा आणि तत्त्वज्ञान त्यांनी आचरणात आणून आपल्यात बदल घडविल्यास त्यांचे आणि माझे वैर संपेल, असा सल्ला शिवसेना उमेदवार आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना दिला आहे.

नारायण राणेंशी माझा वैयक्तिक लढा नाही. ते ज्या दडपशाही प्रवृत्तीने वागतात त्याला माझा विरोध आहे, असंही दीपक केसरकर म्हणाले आहेत. येत्या दोन दिवसांत भाजपचे कार्यकर्ते युतीच्या प्रचारात दिसतील, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

भाजपमध्ये बंडखोरी करून माझ्या विरोधात रिंगणात उभे असलेले अपक्ष उमेदवार राजन तेलींची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली, अशी माहितीही आपल्याला मिळाल्याचे केसरकरांनी सांगितलं.कोणाच्या कुटुंबात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजणार्‍यांपैकी मी राजकारणी नाही ते एक कुटुंब असून ते कुंटुंबच राहिले पाहिजे, असं नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यात सुरु असलेल्या कलहाच्या चर्चांवर केसरकर म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -