घरमहाराष्ट्रनाशिकउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साधला विरोधकांवर निशाणा, म्हणाले - कोणाच्याही पोटात दुखलं तर...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साधला विरोधकांवर निशाणा, म्हणाले – कोणाच्याही पोटात दुखलं तर…

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमावरून कायमच राज्य सरकारवर टीका करत असतात. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नाशिक : शासन आपल्या दारी हा शासनाचा महत्वाकांक्षी असा कार्यक्रम आज (ता. 15 जुलै) नाशिकमध्ये पार पडत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली आहे. त्याशिवाय या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचे महत्त्वाचे मंत्री देखील उपस्थित राहिले आहेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच छताखाली शासनाच्या सेवा देण्यात येणार आहेत. परंतु आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis targeted the opposition)

हेही वाचा – …नाही तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते, संजय राऊतांनी केला खुलासा

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमावरून कायमच राज्य सरकारवर टीका करत असतात. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चांगले काम करून पण काही लोकांच्या पोटात दुखत आहे. पण आता पोटात दुखणाऱ्यांनी चिंता करू नये, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कधीकधी चांगलं काम केले तरी काही लोकांच्या पोटात दुखते. लोकांना लाभ दिला तरी लोकांच्या पोटात दुखते. त्यामुळे काही लोकं याच्यावरही प्रश्नचिन्ह तयार करतात. मग शासन आपल्या दारी कशा करता? लोकं जमा करता ते कशा करता? अरे लोकांना लाभ मिळतो म्हणून लोकं येतात. लोकं स्वतः याठिकाणी येऊन लाभ घेऊन जातात. तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय आहे? असे प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

पण, आता चिंता करू नका. कोणाच्याही पोटात दुखले तर त्या पोटदुखीवर औषध देण्याकरता डॉक्टर एकनाथ शिंदे आम्ही आणलेले आहेत आणि त्यांच्या पचनी पडलं नाही तरी अजित दादा आहेत. त्यामुळे सगळ्यांची जी पोटदुखी आहे, त्याच्यावरचा उपचार आपण करणार आहोत आणि सामान्य माणसाला त्याचे अधिकार देखील देणार आहोत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

मागील आठवड्यात धुळ्यात झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे लावण्यात न आल्याने याबाबतची नाराजी अजित पवार यांनी लगेच व्यक्त केली होती. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजितदादा तुम्ही मागच्या कार्यक्रमात म्हणाले होतात की, दोनच झेंडे दिसत आहेत. आता तिसरा झेंडा पण आला आहे. काळजी करू नका. आपल्याला तीनही झेंडे घेऊन महाराष्ट्राचा झेंडा देशामध्ये सगळ्यात वर न्यायचा आहे. माझा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असेल हे आम्हाला याठिकाणी करून दाखवायचं आहे, असे यावेळी फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -