घरताज्या घडामोडीउपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य महिला पोलिसाच्या हाती ; राजकीय वर्तुळातून होतोय कौतुकाचा वर्षाव

उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य महिला पोलिसाच्या हाती ; राजकीय वर्तुळातून होतोय कौतुकाचा वर्षाव

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. त्यांच्या गाडीचे सारथ्य सांभाळणाऱ्या महिलेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. खाकीतील नारी शक्तीने सिंधुदुर्ग पोलिसांची मान उंचावेल अशी कामगिरी केली आहे.कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील,सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. जिल्ह्यात एखादी व्हीआयपी मुमेंट असल्यावर, पोलिसांना चौफेर लक्ष ठेवावे लागते.याशिवाय ह्या महत्त्वाच्या मंत्र्यासाठी ते ज्या ज्या रस्त्यावरुन जाणार आहेत त्या रस्त्याची आणि जाण्यासाठी असणाऱ्या गाडीची चोख व्यवस्था करावी लागते. मात्र ह्यावेळेस सिंधुदुर्ग पोलिसांनी ही जबाबदारी अनोख्या पद्धतीने पार पाडली आहे.कारण यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य एका महिला पोलिसांच्या हाती दिले होते.चिपी विमानतळावरुन ओरोस ते पुन्हा चिपी विमानतळ असा या मंत्र्याच्या गाडीचा प्रवास होता.या गाडीचे सारथ्य महिला पोलिस कॉस्टेबल तृप्ती मुळीक यांनी केले आहे. त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत असून, एखाद्या मंत्र्याच्या गाडीचे सारथ्य महिला पोलिसांच्या हाती जाण्याची राज्यातील पहिलीच घटना आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले कौतुक

आज ओरस येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.ते विमानतळावरून कार्यक्रमस्थळी आले. तेव्हा त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या महिला पोलीसाने केले.त्यामुळे या भगिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.राज्यात मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिलेने केले ही पहिलीच घटना असावी.राज्य शासन नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत आहे, त्याची ही पावतीच म्हणावी लागेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनाचे सारथ्य करणाऱ्या महिला चालकाचे अजित पवार यांनी कौतुक केले आहे.

- Advertisement -

कोण आहेत ‘तृप्ती मुळीक’

तृप्ती मुळीक या मुळच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या रहिवासी आहेत.त्या सिंधुदुर्ग मोटार परिवहन विभागात कार्यरत आहेत. गेली १० वर्षे त्या महाराष्ट्र पोलीस विभागाच्या माध्यमातून सेवा देत आहेत.त्यांना लहानपणापासूनच गाडी चालवण्याची आवड होती म्हणून त्यांनी नुकतंच व्हीआयपी सेक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला.

 

- Advertisement -

हे ही वाचा – लहान मुलांच्या लसीकरणाचा केंद्राचा निर्णय ‘अवैज्ञानिक’ ; AIIMS तज्ज्ञांचे मत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -