घरमहाराष्ट्रज्यांना भारत जोडो यात्रेत सामील व्हायचंय त्यांनी व्हावं, पण..., देवेंद्र फडणवीसांचं विधान

ज्यांना भारत जोडो यात्रेत सामील व्हायचंय त्यांनी व्हावं, पण…, देवेंद्र फडणवीसांचं विधान

Subscribe

मुंबई – नाना पटोले आमचे मित्र आहेत ते सकाळपासून रात्रीपर्यंत आरोपच करत असतात. त्यांचे आरोप बिनबुडाचे असतात, त्यांच्या आरोपांना थोडीच उत्तर द्यायचं असतं. ज्याला ज्याला या यात्रेस सामील व्हायचंय त्यांनी व्हावं. ही भारत जोडो यात्रा नाही तर मोदी हटावं यात्रा आहे. देशाला मोदींचं जे नेतृ्त्व आहे त्यामुळं समान्यांमध्ये विश्वास निर्माण होत आहे, त्यामुळं भाजपत सारखेच लोक येत आहेत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भारत जोडो यात्रेत अनेक कलाकारांना सहभागी व्हायचं आहे. परंतु, भाजपाच्या भितीने ते यात्रेत सहभागी होत नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस बोलत होते.

- Advertisement -

राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात आलेली आहे. ती सुखरुप बाहेर जाईल याची काळजी आम्ही घेऊ. त्यांचे कार्यक्रम कायदेशीररित्या योग्य प्रकारे पार पडले पाहिजेत याची व्यवस्थाही आम्ही पाहू. ही भारत जोडो नाही तर विरोधकांना जोडो यात्रा आहे. कितीही यात्रा निघाल्या तरी त्यामुळं भाजपला काहीही फरक पडणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -