घरदेश-विदेशVideo : ज्वालामुखीतून बाहेर येतोय धगधगता लावा; ज्वाळा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Video : ज्वालामुखीतून बाहेर येतोय धगधगता लावा; ज्वाळा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Subscribe

निसर्गाचं मनमोहन रुप पाहायला सर्वांनाच आवडतं. पण निसर्ग जितका सुंदर दिसतो तितकंच त्याचं ज्वालाग्राही रुपही पाहायला मिळतं. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ज्वालामुखीतून धगधगता उकळणारा लावा पृथ्वीच्या पृष्ठभागाला फाडून बाहेर येताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे हा ज्वालामुखी पाहण्यासाठी अनेक पर्यटकांनी गर्दी केली आहे. डोळ्यांच्या पापण्या लवत नाहीत तोवर हा लावा पुढे पुढे सरकत होता.

ज्वालामुखीवर असंख्य ज्वालामुखी आहेत. त्यापैकी फार कमी सक्रीय आहेत. या ज्वालामुखींना झोपलेले राक्षस असं विशेषण देण्यात आलेले नाही. हे ज्वालामुखे केव्हाही जागे होऊन जगाचा विनाश करू शकतात. व्हिडिओमध्येही असेच दृश्य पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पहाल की लोक कसं बिनधास्तपणे उभं राहून धगधगता लावा बाहेर पडताना पाहत आहेत. ज्वालामुखीतून उठणाऱ्या या ज्वाला पाहून प्रत्येकालाच भीती वाटेल.

- Advertisement -


हे विस्मयकारक दृश्य आइसलँडच्या रेकजेनेस द्वीपकल्पाचे आहे. हा ज्वालामुखी पाहण्यासाठी पर्यटक येत असता. यासोबतच हा क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले जातात. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @gunsnrosesgirl3 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. 18 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1.5 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे, तर 8 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -