घरमहाराष्ट्रBreaking : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री

Breaking : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री

Subscribe

मुंबईतील राजभवनातून मोठी घडमोड

राज्याच्या राजकारणातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला असेच म्हणता येईल कारण राज्यात महाविकासआघाडीची एकीकडे सत्तास्थापनेची तयारी सुरु असताना हा राजकीय भूकंप झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी आणि भाजपाचं नवं सरकार स्थापन स्थापन झाले आहे. राज्यपालांच्या उपस्थित देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांच्या नंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अजित पवारांनी देखील शपथ घेतली आहे. सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी हा शपथविधीचा सोहळा पार पडला.

- Advertisement -

शुक्रवारी रात्री पर्यंत शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये सरकार स्थापन करण्याची चर्चा सुरु असताना अचानक आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्रातील सत्ताकारणात वेगळे वळण आले आहे.

हा शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मोदींनी ट्विट करत महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोन्ही नेते उत्तमरित्या काम करतील, अशी आशा देखील व्यक्त केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -