घरमहाराष्ट्रबायकोने मारले तरीही म्हणतील केंद्राचा हात

बायकोने मारले तरीही म्हणतील केंद्राचा हात

Subscribe

हे सरकार इतके लबाड आहे की काहीही झाले तरी ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मला तर असे वाटतेय की यांच्या बायकोने मारले तरीही सांगतील की केंद्र सरकारचा हात आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाविकास आघाडीतले लोक कशात भ्रष्टाचार करतील याचा नेम नाही. जमेल त्यात खात आहेत. सामान्य माणसाची अवस्था त्यांनी वाईट करून टाकली आहे, असेही ते म्हणाले.

नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी येथे देगलूर पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारसभेला देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले की, एका मंत्र्याचा जावई गांजा विकताना आढळून आला. पण मंत्री म्हणतो की ही हर्बल तंबाखू आहे. मग आमचे सदाभाऊ खोत म्हणाले, की मराठवाड्यातील शेतकर्‍यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तुमचा मंत्री हर्बल तंबाखू पिकवू शकतो तर शेतकर्‍यांनाही हर्बल तंबाखू लावायची परवानगी द्या. म्हणजे शेतकर्‍यांना चांगले दिवस येतील.

- Advertisement -

अद्याप शेतकर्‍यांना पीकविम्याची पुरेशी रक्कम मिळालेली नाही. आपल्या सरकारच्या काळात आपण किती रक्कम प्रत्येक जिल्ह्याला दिलेली होती, हे मुद्दे त्यांनी या भाषणात अधोरेखित केले. राज्य सरकार स्वतः भ्रष्टाचार करत आहे आणि मदत द्यायची वेळ आली की केंद्राकडे बोट दाखवत आहे, अशा आशयाची टीका करत त्यांनी ठाकरे सरकारला जबरदस्त टोला लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -