घरताज्या घडामोडीदुसरा बॉम्ब कुठे आहे? विधानसभेत हातवारे करुन दंड थोपटल्याच्या व्हिडीओवर धनंजय मुडेंची...

दुसरा बॉम्ब कुठे आहे? विधानसभेत हातवारे करुन दंड थोपटल्याच्या व्हिडीओवर धनंजय मुडेंची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

महाराष्ट्र अर्थसंकल्प अधिवेशनात विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरु होते. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील सभागृहात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे वित्तीय अहवाल सादर करत होते. यावेळी त्यांच्या मागच्या बाकावर बसलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बॉम्ब कुठे आहे? असे हातवारे करुन विरोधकांना प्रश्न विचार होते यावेळी त्यांनी आपण तयार असल्याचे सांगत दंड थोपटले होते. याबाबत धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडेंनी हातवारे करुन प्रश्न केला असल्याची व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांना विधानसभा अधिवेशनादरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत प्रश्न विचारण्यात आला. बॉम्ब कुठे आहे? असे हातवारे करुन मंत्री मुंडे विचार होते. यामुळे लोकांच्या मनातही तर्क वितर्क सुरु होते. अखेर यावर धनंजय मुंडे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

- Advertisement -

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, विधानसभा सभागृहात तुम्ही जे काही पाहिले ते खरं होते. स्पष्टपणे हातवारे सुरु होते. विरोधी पक्षनेते समोर बसले होते. विधिमंडळ परिसरातही आरोपांचा दुसरा बॉम्ब फोडण्यात येणार असल्याची चर्चा होती. म्हणून मी सहज इशारा करुन विरोधकांना बॉम्ब फोडणार का? विचारले त्यांचे लक्ष नव्हते यामुळे मी दोनवेळा त्यांना इशारा करुन विचारले. त्यांनी माझ्याकडे बोट दाखवून होकार दिला. माझ्यासंबंधी बॉम्ब असल्याचे मला वाटले त्यामुळे मी तयारीत असल्याचे सांगितले, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी व्हायरल व्हिडीओवर दिले आहे.

महाविकास आघाडीविरोधात सूडभावनेने कारवाई कऱण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. एक आरोपांचा बॉम्ब फोडल्यानंतर दुसरा बॉम्ब फोडणार असल्याचे सांगण्यात येत होते. यामुळे आम्ही तयार आहोत अशी भूमिका दाखवत बॉम्ब फोडणार आहे का? अशी विचारणा केली. सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात सर्व काही झाले आणि ते मजेने बोललं गेलं अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ईडीच्या नोटीशीमुळे कोहिनूर टॉवर लगेच हालायला लागला, भुजबळांचा राज ठाकरेंना टोला

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -