घरमहाराष्ट्र'...तर महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ले रोप-वेनी कनेक्ट करणार'; मंत्री नितीन गडकरींचे वक्तव्य

‘…तर महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ले रोप-वेनी कनेक्ट करणार’; मंत्री नितीन गडकरींचे वक्तव्य

Subscribe

राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांवर रोप बांधणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. रायगड जिल्ह्यातील इंदापूर इथं कासु ते इंदापूर या काँक्रीट मार्गाच्या कामाचे भूमिपूजन आणि दिघी ते माणगाव, इंदापूर ते आगरदांडा या राष्ट्रीय महामार्गचा लोकार्पण सोहळा पार पडला. या लोकार्पण सोहळ्यावेळी नितीन गडकरी यांनी म्हटलं.

राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांवर रोप बांधणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. रायगड जिल्ह्यातील इंदापूर इथं कासु ते इंदापूर या काँक्रीट मार्गाच्या कामाचे भूमिपूजन आणि दिघी ते माणगाव, इंदापूर ते आगरदांडा या राष्ट्रीय महामार्गचा लोकार्पण सोहळा पार पडला. या लोकार्पण सोहळ्यावेळी नितीन गडकरी यांनी म्हटलं.

या लोकापर्ण सोहळ्यावेळी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर रोप बांधावेत या संदर्भात निवेदन दिल्याचं म्हटलं. त्यावेल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ल्यांवर रोप-वेचे बांधकाम करून देईन असं म्हटलं.

- Advertisement -

”महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व किल्ले हे कोकणाच्या पार्श्वभूमीवर आहेत. आपल्या जीवनात आई-वडिलांपेक्षा मोठं स्थान छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. त्यामुळं हे सगळे गड-किल्ले चांगले झाले पाहिजे. लाईट आणि साऊंड शो झाला पाहिजे. तरुण पिढीला इतिहास समजवला पाहिजे. तसंच, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगाना त्या ठिकाणी व्यवसता झाली पाहिजे. यासाठी सर्व गड-किल्ल्यांवर रोप वे बांधून देईन”, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

‘मी अस मंत्री आहे माझ्याकडे पैशाची अडचण नाही’

- Advertisement -

‘हवेत उडणारी बस सूरू करणार आहे. जगातुन चांगली टक्नॉलॉजी येत आहे. डॉफल मेअरची ऑस्ट्रेलियन टेक्नॉलजी आणली आहे. त्यामुळं मी या सर्व गजड किल्ल्यावर रोप वे बांधून देईन’, असं आव्हान नितीन गडकरी यांनी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना दिलं. तसंच, ‘मी अस मंत्री आहे माझ्याकडे पैशाची अडचण नाही’ असंही नितीन गडकरी यांनी यावेळी म्हटलं.


हेही वाचा – Weather Update : राज्यात येत्या ४-५ दिवसात जोरदार वाऱ्यासह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -