घरमहाराष्ट्र'अर्धवटराव आधी भाजपविरोधात बोलायचे, सीडी लावायचे, ईडी घुसली अन्...'; धनंजय मुंडे राज...

‘अर्धवटराव आधी भाजपविरोधात बोलायचे, सीडी लावायचे, ईडी घुसली अन्…’; धनंजय मुंडे राज ठाकरेंवर बरसले

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यात झालेल्या सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पक्षावर जोरदार टीका केली. या टीकेवर सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे जोरदार बरसले. धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांना अर्धवटराव अशी उपमा देत जोरदार टीकास्त्र डागलं. अर्धवटराव आधी भाजपच्याविरोधात खूप बोलायचे, सीडी लावायचे, ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्पच बसले, असा हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर केला.

इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार संवाद दौरा होता. यावेळी धनंजय मुंडे यांनी तुफान बॅटींग केली. राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंवर ते जोरदार बरसले. “शरद पवारांची भिती यांना वाटते. मधल्या काळात यांनी भाजपच्या एवढ्या सीड्या लावल्या की यांच्यात ईडी घुसली. त्या ईडीचा परिणाम असा झाला की, लाव रे ती सीडी म्हणणारे आज कुठंय रे ती सीडी असं म्हणतायत,” अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंचा समाचार घेतला.

- Advertisement -

राज ठाकरे तुमचा ओम फट स्वाहा करतील – मनसे

राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसे नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे तुमच्यासारख्या तात्याविंचूचा ओम फट स्वाहा करतील. लवकरच तुमचा थयथयाट होईल. गेट वेल सून धनंजय मुंडे असं अमेय खोपकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -