घरताज्या घडामोडीJahangirpuri Violence : जहांगीरपुरीमधील बुलडोझरला सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक, तोडकाम थांबवण्यासाठी दिल्ली महापालिकेला...

Jahangirpuri Violence : जहांगीरपुरीमधील बुलडोझरला सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक, तोडकाम थांबवण्यासाठी दिल्ली महापालिकेला आदेश

Subscribe

दिल्लीच्या दंगलग्रस्त जहांगीरपुरीतल्या अनधिकृत बांधकामांवरती आजपासून पोलिसांनी कठोर करवाईला सुरूवात केली आहे. येथील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवला जात आहे. तसेच पाच आरोपींना गजाआड करण्यात आलं आहे. पाच आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई पार पडली आहे. मात्र, हे तोडकाम थांबवण्याचे आदेश हे सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली महापालिकेला दिले आहेत. तसेच या प्रकरणी आता उद्या सुनावणी देखील होणार आहे.

दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या शोभा यात्रेवर दगडफेक करण्यात आली होती. शोभा यात्रादरम्यान दोन गट आमने-सामने आले आणि दंगलसारखी परिस्थिती निर्माण झाली. हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ५ ते ६ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. तर गोळीबार झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यामुळे हिंसाचारानंतर या भागात महापालिकेचा बुलडोझर फिरवला जात आहे. यासाठी महापालिकेने दिल्ली पोलिसांकडे सुरक्षा मागितली आहे. त्यानुसार दीड हजार पोलीस येथील भागात तैनात करण्यात आले आहेत.

- Advertisement -

कारवाईला सुरूवात करण्याआधी या भागात पोलिसांनी फ्लॅग मार्च देखील काढला. तसेच कारवाई करण्यापूर्वी येथील स्थानिक लोकांनी साहित्य दुसरीकडे नेण्यास सुरूवात केली आहे. काही साहित्य हे रस्त्यावर असलेलं दिसत आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारवाईत दिल्ली पोलिसांचं मोठं बळ असताना दिसत आहे. या कारवाईत स्थानिक लोकांनी सहकार्य करावं, अशा प्रकारचं आवाहन दिल्ली पोलिसांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

जहांगीरपुरीत नेमकं काय घडलं होतं?

दिल्लीच्या जहांगीरपुरीत हनुमान जयंतीच्या दिवशी मोठा हिंसाचार झाला. मिरवणूक सुरू असताना जामा मशिदीजवळ क्षुल्लक वाद झाला. त्यानंतर दगडफेक आणि हिंसाचार उसळला. पोलिसांनी अटक केलेला आरोपी सोनू चिकना याचा फायरिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हनुमान जयंतीला परवानगीशिवाय शोभायात्रा काढल्यानं बजरंग दलाविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दंगलखोरांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

पोलिसांकडून तपासासाठी ड्रोनचा वापर

जहांगीरपुरीमध्ये शोभा यात्रेत झालेल्या दंगलीमध्ये गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली. यामध्ये एक पोलीस अधिकारी गोळी लागल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे. ६ राऊंड फायर झाले असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. दंगलखोरांनी दगडफेक करण्यासाठी घरांच्या कौलांवर दगड गोळा केले होते. याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर केला होता.


हेही वाचा : न्यायव्यवस्थेवरील टीका संजय राऊतांना भोवण्याची शक्यता, इंडियन बार असोसिएशनकडून अवमान याचिका दाखल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -