घरमहाराष्ट्रइतिहासाची पुनरावृत्ती होणार? शिवसेनेकडे 'ही' खाती येण्याची शक्यता

इतिहासाची पुनरावृत्ती होणार? शिवसेनेकडे ‘ही’ खाती येण्याची शक्यता

Subscribe

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने शिवसेनेला वगळून सरकार स्थापन केले होते. त्यावेळी सरकारमध्ये सहभागी होताना सेनेला कमी मंत्रिपदे तसेच दुय्यम खात्यांवर समाधान मानावे लागले होते. परंतु, आता शिवसेना सांगेल ती पूर्वदिशा असे म्हटल्याशिवाय भाजपचे भागणार नाही.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपला १०५ जागांवर तर शिवसेनेला ५६ जागांवर यश मिळाले आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपला आता शिवसेनेची गरज लागणार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने शिवसेनेला वगळून सरकार स्थापन केले होते. त्यावेळी सरकारमध्ये सहभागी होताना सेनेला कमी मंत्रिपदे तसेच दुय्यम खात्यांवर समाधान मानावे लागले होते. परंतु, आता शिवसेना सांगेल ती पूर्वदिशा असे म्हटल्याशिवाय भाजपचे भागणार नाही. त्यामुळे युतीत सत्तावाटपासाठी १९९५ चे सूत्र लागू होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – लांबलेल्या पावसाने उदयनराजेंचा बळी घेतला – जितेंद्र आव्हाड

- Advertisement -

शिवसेनेकडे कोणती खाती येणार?

आधी समान सत्तावाटप नंतर सरकार अशी आक्रमक भूमिका शिवसनेने घेतल्याने युतीत सत्तावाटपासाठी १९९५ चे सूत्र लागू होण्याची शक्यता आहे. शिवसेना मुख्यमंत्रीपदाबाबत आग्रही आहेच. शिवाय १९९५ प्रमाणे गृह, वित्त, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, ग्रमविकास, ऊर्जा, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, आदिवासी विकास अशा महत्त्वाच्या खात्यांवर दावा करू शकते. राज्यात दिवाळीनंतर सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग येईल. शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तावाटपाचा फार्म्युला ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सारे काही ठरल्याप्रमाणे होईल, असे म्हटले आहे. परंतु, सत्तावाटपाचा नेमका फार्म्युला हा भाजप अध्यक्ष अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे या तिघांनाच ठाऊक आहे. त्यामुळे प्रत्यक्षात युतीचे मंत्रिमंडळ स्थापन होऊन खातेवाटप होईपर्यंत हा फार्म्युला गुलदस्त्यात राहणार आहे.

हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांची भावनिक पोस्ट; ‘संघर्षातून उभे राहिलो, हक्कांसाठी लढत राहू’

- Advertisement -

काय आहे इतिहास?

राज्यात १९९५ मध्ये पहिल्यांदा युतीचे सरकार आले होते. त्यावेळी ज्या पक्षाचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असे सूत्र होते. १९९५ मध्ये शिवसेनेला ७३ तर भाजपला ६५ जागा मिळाल्या होत्या. ४५ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने युतीचे सरकार साकारले. त्यावेळी मुख्यमंत्रिपदासह महसूल, उद्योग,परिवहन, सहकार, सामाजिक न्याय, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास ही महत्त्वाची खाती शिवसेनेकडे होती. तर भाजपच्या वाट्याला गृह, वित्त आणि नियोजन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, ऊर्जा, ग्रमविकास, पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य, आदिवासी विकास अशी महत्त्वाची खाती आली होती. युतीचा हा फार्म्युला १९९९, २००४, २००९ या आघाडी सरकारमध्ये जवळपास सारखा होता. यावेळी भाजपकडे शिवसेनेपेक्षा ४९ जागा जास्त असल्या तरी मुख्यमंत्रीपद घेण्याबाबत सेनेचे आमदार प्रचंड आग्रही आहेत. निदान अडीच-अडीच वर्ष किंवा तीन आणि दोन वर्ष असा मुख्यमंत्रीपदाचा फार्म्युला ठरावा. याशिवाय सत्तेत महत्त्वाची खाती मिळावीत, असे सेना आमदारांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -