घरक्राइमवाडीवर्‍हे फाट्यावर थेट पोलिसांवर कोयत्याने हल्ला

वाडीवर्‍हे फाट्यावर थेट पोलिसांवर कोयत्याने हल्ला

Subscribe

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीवर्‍हे फाट्यावर बुधवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास वाद सोडविण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार योगेश पाटील यांच्यावर एका तरुणाने धारदार कोयत्याने वार केला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी गुरुवारी समृद्धी महामार्गालगत लपून बसलेल्या चौघांना अटक केली.

सारंग रंगनाथ माळी (वय २३ वर्षे रा. माणिकखांब), तुषार प्रकाश भागडे (वय १९, रा. तळेगाव, इगतपुरी), नागेश हरिश्चंद्र भंडारी उर्फ चिमण्या (वय १८, रा. नांदगाव सदो), पुरुषोत्तम संजय गिरी (वय १९, रा. वाडीवर्‍हे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बुधवारी रात्री ११ वाजेदरम्यान पोलीस कर्मचारी योगेश पाटिल आणि त्यांचे एक सहकारी प्रविण तातळे इगतपुरीकडून नाशिककडे येत होते. त्यांना वाडीवर्‍हे येथील कवटी फाटा पोलीस चौकीमागे हॉटेल ब्रम्हगिरीजवळ वाद सुरु असल्याचे दिसले. वाद सोडविण्यासाठी योगेश पाटील व निवृत्ती तातडे गेले असता त्यांना संशयित आरोपींनी आमच्या वादात का पडले या कारणावरुन कुरापत काढली. संशयित आरोपी सारंग माळी याने ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील कोयत्याने पोलीस हवालदार योगेश पाटील याचे डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले. आरोपी तुषार भागडे याने निवृत्ती तातडे याचे डोक्यात लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केले. आरोपी नागेश भंडारी, पुरुषोत्तम गिरी यांनी जखमी साक्षीदारांना वाईट साईट शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली, असे पोलीस हवालदार प्रविण भाऊराव मासुळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisement -

पोलीस कर्मचार्‍यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच वाडीवर्‍हे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, हल्लेखोर दुचाकीने फरार झाले होते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांची माहिती मिळवत पोलिसांनी गुरुवारी समृद्धी महामार्गालगत लपून बसलेल्याचार आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -