घरमहाराष्ट्रनाशिक‘उडाण’ची मुदत संपल्याने विमानसेवा बंद ?

‘उडाण’ची मुदत संपल्याने विमानसेवा बंद ?

Subscribe

नाशिक : गुजरात राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विमानसेवा बंद झाल्याचा आरोप होत असताना केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या आरोपांना सडेतोड उत्तर दिले. केंद्र सरकारच्या उडान या योजनेची मुदत संपल्याने व्यावसायिकदृष्ठ्या ही सेवा सुरू ठेवणे शक्य नसल्याचे विमान कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे नाशिकची विमानसेवा बंद झाल्याचे त्यांनी शुक्रवारी (दि.4) पत्रकार परिषदेत सांगितले.

अलायन्स एअर या कंपनीने नाशिक-अहमदाबाद, पुणे, बेळगाव आणि दिल्ली या शहरांची विमानसेवा बंद केली आहे. यासंदर्भात केंद्रिय उडान मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांच्याशी पत्रव्यवहार केला असून, स्पाईस जेट आपली विमानसेवा सुरू करणार आहे. यात नाशिक-हैदराबाद, दिल्ली, तिरुपती व पदुचेरी येथील विमानसेवा नाशिककरांना मिळणार आहे. उडाण योजनेंतर्गत विमान कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना होती. त्यानंतरही अलायन्स एअर सेवा देत होती. आर्थिकदृष्ठ्या परवडत नसल्यामुळे त्यांना ही सेवा देणे आता शक्य होत नसल्याचे विमान कंपनीने केंद्र सरकारला कळवले आहे. त्यामुळे नाशिकहून देण्यात येणारी अहमदाबाद, पुणे, दिल्ली ही सेवा बंद झाली आहे.

- Advertisement -

केंद्राने ‘उडान’ योजना राबविताना तीन वर्षांचा कालावधी ठरवून दिला होता. त्यानुसार अलायन्स एअरलाईन्सला नाशिकमधून सेवा देताना जानेवारीत त्यांची मुदत संपुष्टात आल्यानंतरही कंपनीने आतापर्यंत सेवा सुरू ठेवली. पण, व्यावसायिक ‘उडान’साठी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभत असल्याने कंपनीने नाशिक-पुणे तसेच, हैदराबाद-नाशिक-अहमदाबाद-दिल्ली सेवा बंद केली. तसेच, स्पाईस जेटची नाशिक-दिल्ली सेवा कायम असून त्याची मुदत पुढील वर्षापर्यंत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राजकीय दबावातून अन्य राज्यात विमान पळवून नेल्याचा इन्कार केला. नाशिकमध्ये विमानसेवेला मिळणारा प्रतिसाद बघता ‘उडान’मधून त्यांना मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पवार यांनी दिली. नाशिकमधून गोवा, कोलकाता, भोपाळच्या विमानसेवेसाठी इंडिगो कंपनीशी संपर्कात असल्याचेही पवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -