घरमहाराष्ट्रउपेक्षित वर्गाला पैसे देण्यासंदर्भात पंतप्रधानांशी चर्चा सुरु - अजितदादा पवार

उपेक्षित वर्गाला पैसे देण्यासंदर्भात पंतप्रधानांशी चर्चा सुरु – अजितदादा पवार

Subscribe

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या लॉकडाऊन काळातील सामाजिक विधायक कार्यासंबंधी माहिती देण्यासाठी मंगळवार २३ जूनला नवीन राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतंय या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने केलेल्या मदतीची माहिती देण्यात आली. यावेळी उपेक्षित वर्गाला पैसे दिले पाहिजेत असं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले. यासाठी आम्ही पंतप्रधानांशी संवाद सादत आहोत.

लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल जाले आहेत त्यांना मदत म्हणून त्यांच्या हातात पैसे दिले पाहिजेत. यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत राज्याचे मुख्यमंत्रीही पंतप्रधानांशी संवाद साधत आहेत. आम्ही याबाबत त्यांना पत्र लिहिलं आहे, असं अजित पवार म्हणाले. शिवाय, विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांबाबतही लवकर निर्णय घेण्यात येईल. कोरोनाच्या संकटात विद्यार्थी-पालकांना अडचण येऊ देणार नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं. अद्याप अर्थव्यवस्था पूर्वपदावर आलेली नाही. यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिना जिकरीचा आहे असं अजितदादा पवार म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -