घरमहाराष्ट्रपती आवडला नाही, लग्नाच्या २१ व्या दिवशी केली पतीची हत्या; पोलिसांनी लावला...

पती आवडला नाही, लग्नाच्या २१ व्या दिवशी केली पतीची हत्या; पोलिसांनी लावला छडा

Subscribe

बीड – लग्नाच्या अवघ्या २१ दिवसांमध्ये नववधुने आपल्या पतीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पती आवडत नसल्याने तिने पतीची हत्या केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली. पांडरुंग चव्हाण असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे. ८ नोव्हेंबर रोजी गेवराईमध्ये हा प्रकार घडला. शीतल चव्हाण असं आरोपी पत्नीचं नाव असून तिच्याविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२२ वर्षीय पांडुरंग रामभाऊ चव्हाण याचा शीतल चव्हाण या तरुणीसोबत काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. मात्र, ७ नोव्हेंबर रोजी पांडरुंग यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांना त्यांना मृत म्हणून घोषित केलं. परंतु, मृताच्या नातेवाईकांनी गेवराई पोलीस ठाणे गाठून नववधूविरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला. तिची कसून चौकशी करण्यात आली. अखेर तिने पतीच्या हत्येची कबुली दिली.

- Advertisement -

पतीचा गळा आवळल्याची तिने कबुली दिली. मात्र, त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानेच झाल्याचा दावा तिने केला. परंतु, पोलिसांनी पुन्हा तपास करत त्याची हत्या गळा दाबून झाल्यानेच झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -