घरCORONA UPDATE'लॉकडाऊननंतर सिंधुदुर्गात मुंबईकरांना एंट्री देऊ नका' - सिंधुदुर्गकरांचे निवेदन

‘लॉकडाऊननंतर सिंधुदुर्गात मुंबईकरांना एंट्री देऊ नका’ – सिंधुदुर्गकरांचे निवेदन

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेला दुसरा लॉकडाऊन ३ मे रोजी संपत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याची ग्रीन, ऑरेंज आणि रेडझोनमध्ये वर्गवारी करुन जनजीवन सुरळीत करण्याचा मानस बोलून दाखवला. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीन झोनकडे वाटचाल करत आहे. मात्र तरिही या जिल्ह्याच्या सीमा बंद ठेवाव्यात तसेच मुंबईतील चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश देऊ नये, अशा मागणीचे निवेदन सिंधुदुर्गातील रहिवशांना एकत्रितपणे मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग विचारात घेतला. तर तो आज मुंबई – पुणे याठिकाणी गुणाकार पद्धतीने वाढत आहे. लॉकडाऊननंतर सर्व चाकरमानी आपल्या मूळ गावी येण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी आपले देवही पाण्यात ठेवले आहेत. हे सर्व चाकरमानी गावाकडे आले आणि येताना त्यांनी एक-दोन कोरोनाचे व्हायरस सोबत आणले तर आपलं काय होणार? या दबावाखाली सिंधुदुर्गवासी सध्या आहेत. काहीजण छुप्या मार्गाचा अवलंब करूनही येण्याच्या प्रयत्नात आहेत. ते जर गावात आले तर जिल्हा प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या आगमनाबाबत नैतिकतेचे भान ठेऊन काही लोक प्रशासनास कल्पना देतीलही. परंतु यातून गावागावात वाडी वाडीत अंतर्गत कलह वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा बंदी उठवण्याचा निर्णय प्रशासनाने घेऊ नये, अशी कळकळीची विनंती सिंधुदुर्गातील विविध ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ आणि दुर्गम भागात विखुरलेला आहे. साहजिकच या महामारीचा प्रतिकार करणे उपलब्ध असलेल्या आरोग्य यंत्रणेसह सर्वांनाच जिकरीचे होऊ शकते. यातून ग्रीन झोनकडे वाटचाल करत असलेला आपला जिल्हा रेड झोनकडे जाऊ शकतो. त्यामुळे विद्यमान परिस्थितीत एकही रुग्ण नाही, म्हणून जिल्हा बंदी उठविण्याबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

मुंबई-पुणे या भागात कोकणातील पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरीच लोकसंख्या कायम स्वरूपी वास्तव्यास आहे. आज ते या महामारीने त्रस्त आहेत. हे आम्ही याठिकाणी नाकारात नाही. परंतु कोकण आणि जिल्हावासीयांच्या चांगल्या आरोग्यासाठी जिल्हाबंदी हटवण्याची कार्यवाही करू नये, अशी विनम्रपूर्वक मागणी सिंधुदुर्गकरांनी केली आहे.

- Advertisement -

हे निवेदन जोसेफ डॉन्टस – सरपंच ग्रामपंचायत माणगाव, गजानन (आबा) केसरकर – अध्यक्ष माणगाव जेष्ठ नागरिक संघटना, सचिव नागेश नानचे, डॉ दत्ता शिरसाट – अध्यक्ष कुडाळ तालुका जेष्ट नागरिक संघटना, शंकर पाडगावकर – माणगाव जेष्ठ नागरिक संघटना, महेश भिसे, केशव भर्तु, दत्ता कोरगावकर – सदस्य माणगाव ग्रामपंचायत
डॉ. रामचंद्र गणपत्ते – अध्यक्ष दत्त मंदिर माणगाव, दीपक साधले, विश्वस्थ दत्त मंदिर माणगाव, माधव चव्हाण – विश्वस्थ दत्त मंदिर माणगाव, सुनील घाग, दादा कोरगावकर, बाळा पेडणेकर आणि इतर सिंधुदुर्ग ग्रामस्थांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आण पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -