घरCORONA UPDATEनवजात बाळाचा डॉक्टरांमुळे पुनर्जन्म; सोशल मीडियावर आर्थिक मदतीचा ओघ

नवजात बाळाचा डॉक्टरांमुळे पुनर्जन्म; सोशल मीडियावर आर्थिक मदतीचा ओघ

Subscribe

जन्मतः श्वसनविकाराची (न्यूमोनिया) समस्या असणाऱ्या बाळाला चेंबूरमधील झेन हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश मिळाले आहे. बाळाला श्वास घेण्यात अडचण असल्याने त्याचा जीव वाचण्याची शक्यता फक्त १ टक्का इतकीच होती. परंतु, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे या नवजात बाळाचा दुसरा जन्म झाला आहे. बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्याला घरी सोडण्यात आले आहे.

गोवंडीमध्ये राहणाऱ्या विकास फलटणकर यांना २२ एप्रिलला मुलगा झाला. घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याने कुटुंबात उत्साहाचे वातावरण होते. शिवाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये विकास यांच्या पत्नीने बाळाला जन्म दिला. पण बाळाला न्यूमोनिया झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला व्हेंटिलेटरची आवश्यक आहे. त्यामुळे तातडीने त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार बाळाला चेंबूरमधील झेन हॉस्पिटलमध्ये हलवले. बाळाला श्वास घेता येत नसल्याने कुटुंबिय चिंतेत होते. बाळाला श्वास घेण्यास अडचणी येत असल्याने त्याच्या छातीत नळी घालण्यात आली. त्यानंतर बाळाचा प्रकृती सुधारणा होऊ लागली.

- Advertisement -

जन्मतः या बाळाला ‘मेकोनिझम अस्प्रिरेशन सिंड्रोम’ म्हणजेच न्यूमोनिया हा आजार असल्याचे निदान झाले होते. त्यामुळे या बाळाला श्वास घेण्यास अडचणी येत असल्याने त्याच्या छातीत नळी घालण्यात आली होती. परंतु, आता बाळाचा प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे फलटणकर कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. परंतु, बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा विकास फलटणकर यांच्याकडे फक्त ४० हजार रूपये होते. तरीही डॉक्टरांनी बाळावर उपचार केले. बाळाला पुढील उपचारासाठी जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची गरज होती. त्यासाठी पैशांची गरज लागणार होती. त्यामुळे फलटणकर कुटुंबियांची चिंता दूर झाली नसून उपचारासाठी लागणारा पैसा कसा उभा करायचा हा प्रश्न आहे. यासाठी फलटणकर कुटुंबियांनी क्राऊंड फंडिगचा मार्ग स्विकारला असून सोशल मिडियावरून त्यांनी आर्थिक मदतीसाठी आवाहन केले आहे.

जन्मतः या बाळाला ‘मेकोनिझम अस्प्रिरेशन सिंड्रोम’ म्हणजेच न्यूमोनिया हा आजार असल्याचे निदान झाले होते. त्यामुळे या बाळाला श्वास घेण्यास अडचणी येत असल्याने त्याच्या छातीत नळी घालण्यात आली होती. परंतु, आता बाळाचा प्रकृती उत्तम असल्याचे झेन हॉस्पिटलमधील बालरोग तज्ज्ञ डॉ. कविता गोहिल यांनी सांगितले.

- Advertisement -

बाळाला नऊ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर त्याच्या प्रकृती सुधारणा झाल्याने व्हेटिलेटर काढण्यात आले. बाळाला स्तनपान सुरू करून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. बाळाची प्रकृती सुधारल्याने त्याला ७ मे रोजी त्याला घरी सोडण्यात आले.
– डॉ. रोहित नार्वेकर, बालरोगतज्ज्ञ, झेन हॉस्पिटल

चेंबूरकरांनी जमवले दीड लाख

आर्थिक मदतीसाठी सोशल मिडियावर विकास यांनी आवाहन केल्यानंतर चेंबूर वेल्फेअर ब्रिगेडने पुढाकार घेत, हॉस्पिटलला भेट दिली. डॉक्टरांना भेटल्यानंतर त्यांनी मदतीचा निर्णय घेतला. त्यांनी चेंबूरच्या नागरिकांना मदतीचे आवाहन केल्यानंतर आतापर्यंत १ लाख ५५ हजार जमा झाले असून, ते सर्व पैसे हॉस्पिटलमध्ये जमा करण्यात आले असल्याची माहिती चेंबूर वेल्फेअर ब्रिगेडचे संयोजन शिवराज पंडित यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -