घरमहाराष्ट्रमहिला रुग्णाकडे कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून शरीरसुखाची मागणी

महिला रुग्णाकडे कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून शरीरसुखाची मागणी

Subscribe

डॉक्टराला तातडीने हाकलले

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर दुसर्‍या बाजूला मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये एक धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना घडली आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेकडे शरीरसुखाची मागणी चक्क डॉक्टराने केली असल्याचा आरोप आहे. या घटनेबाबत कळताच संतप्त झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टराला बेदम मारहाण केली. या प्रकरणाची चौकशी करावी आणि अहवाल सादर करावा, असा आदेश आता औरंगाबादचे आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी दिला आहे. पण आता या डॉक्टराची रुग्णालयातून हकालपट्टी केल्याचे समोर आले आहे.

मंगळवारी संध्याकाळी ही घटना औरंगाबादमधील पदमपुरा कोविड केअर सेंटरमध्ये घडली. संध्याकाळच्या वेळी या महिलेकडे डॉक्टरने शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर याबाबतची माहिती उपचार घेणार्‍या महिलेने घरी कळवली. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात शिरून डॉक्टराला बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली. या सर्व प्रकरणी अहवाल सादर करून, चौकशी करावी असा आदेश औरंगाबादच्या आयुक्तांनी दिला. त्यानंतर तातडीने या डॉक्टरावर कारवाई करून त्याची रुग्णालयातून हकालपट्टी करण्यात आली. यासंदर्भातील माहिती औरंगाबादच्या आरोग्य अधिकार्‍यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिली.

- Advertisement -

याआधी अमरावतीमध्ये अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली होती. दारूच्या नशेत पोलीस पाटलाने गावातील क्वारंटाईन कक्षात थेट शिरून महिलेला शरीर सुखाची मागणी केल्याचे समोर आले होते. ही मागणी पूर्ण न केल्यास उपाशी ठेवण्याची धमकी देखील पोलीस पाटलाने या महिलेला दिली होती. त्यानंतर घाबरलेल्या महिलेने आरडा-ओरड करत क्वारंटाईन कक्षातून पळ काढला आणि चांदूर रेल्वे पोलीस स्थानकात पोहोचली. येथे महिलेने घडलेल्या प्रकाराबद्दल तक्रार दाखल केली आणि आरोपी पाटलास पोलिसांनी अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -