नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक! लग्न करण्यासाठी प्रशासनाची घ्यावी लागणार परवानगी

Permission from the administration for weddings and other events in nagpur rural
नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक! लग्न आणि इतर कार्यक्रमासाठी प्रशासनाची घ्यावी लागणार परवानगी

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने जिल्ह्यातील प्रशासनाला लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांसंबंधित निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. यामुळे काही जिल्ह्यांमध्ये सध्या लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूर प्रशासनाने आता ग्रामीण भागासाठी मोठा निर्णय घेतला आहे. वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमुळे जर ग्रामीण भागात विवाह किंवा इतर कार्यक्रम करायचे असतील तर तुम्हाला त्यापूर्वी प्रशासनाची परवानगी घेणे अवश्य असणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी काल (गुरुवारी) काढले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागपूरातील मंगळ कार्यालयं, लॉनस् येथील होणारे विवाह सोहळा आणि इतर समारंभाच्या आयोजनास यापूर्वीच प्रतिबंध लावण्यात आले आहे. त्यामुळे जरी घरगुती कार्यक्रम करायचा असेल आणि जास्त संख्येने लोकं येणार असतील तर तुम्हाला प्रशासनाची परवानगी जरूर घ्यावी लागणार आहे.

सध्या नागपूरमध्ये कोरोनाचा धोका वाढत आहे. गेल्या २४ तासांत १ हजार ७० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ८ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ७२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पण सध्या नागपूरमध्ये मार्च २०२०मध्ये जी कोरोनाची स्थिती होती तिची स्थिती पुन्हा एकदा मार्च २०२१ मध्ये दिसत आहे.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यात गुरुवारी ८ हजार ९९८ कोरोना रुग्णांची नोंद