घरमहाराष्ट्र'जनरल डायर'वर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांकडे आहे काय? ठाकरे गटाचा फडणवीसांवर निशाणा

‘जनरल डायर’वर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांकडे आहे काय? ठाकरे गटाचा फडणवीसांवर निशाणा

Subscribe

मुंबई : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात जे घडले ते चीड आणणारे आहे. पोलिसांनी चहुबाजूने घेरून मराठा आंदोलकांवर अमानुष हल्ला चढवला. स्वातंत्र्यलढ्यात अमृतसरमध्ये ब्रिटिशांनी जसे जालियनवाला बागेचे हत्याकांड घडवले, त्याच घटनेची आठवण व्हावी, असा हा राक्षसी हल्ला होता. आंतरवालीच्या घटनेनंतर झालेला उद्रेक पाहून सटपटलेल्या सरकारने आता जालन्याच्या पोलीस प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठवले; पण या प्रकरणात पोलिसांपेक्षा अधिक दोष उपोषण चिरडण्याचे आदेश देणाऱ्या जनरल डायरचा आहे. त्याच्यावर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे काय? असा सवाल करत ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – मराठ्यांसाठी ‘राज’ मैदानात; जालन्यातील आंदोलकांची घेणार भेट

- Advertisement -

महाराष्ट्रातील मराठा, धनगर व अन्य काही समाज सातत्याने आरक्षणासाठी आंदोलने करत आहेत. मराठा समाजाने तर शांततेच्या मार्गाने लाखोंचे मोर्चे काढले. एक ठिणगी कुठे पडली असती तर, वणवा पेटायला वेळ लागला नसता. पण मराठा आंदोलक सदैव संयम बाळगूनच आंदोलने करत असताना आंतरवाली सराटीत पोलिसांचा फौजफाटा घुसवून जालियनवाला बाग घडवण्याचे फर्मान फोनवरून कोणी सोडले? आंतरवालीत अमानुष लाठीहल्ला व गोळीबाराचे आदेश देणारा जनरल डायर कोण? याचा छडा लागलाच पाहिजे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

महाराष्ट्रात पेटवापेटवी करायची आहे काय?

पोलिसांनी आंतरवालीमध्ये बळाचा जो अतिरेकी वापर केला, तो पाहता राज्यातील शिंदे सरकारला व फडणवीसांच्या गृहखात्यालाच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात पेटवापेटवी करायची आहे काय? असा प्रश्न शांततेने आंदोलन करणाऱया मराठा समाजाला व महाराष्ट्राच्या जनतेलाही पडला आहे. कारण लाठीहल्ला करावा, गोळीबार करावा असे तर आंतरवालीत काहीच घडले नव्हते, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भारत करतोय प्रगती; विदेशी मीडियांनी केले मोदींचे कौतुक

अजूनही उपोषण सुरू

आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकंदर सात जण उपोषणाला बसले होते. चार दिवसांपासून शांततेने उपोषण सुरू होते. पंचक्रोशीतील मराठा समाजाचे लोक आंदोलन स्थळी येऊन पाठिंबा देत होते. मराठवाड्यातील मराठा समाजाला निजाम राजवटीत आरक्षण मिळत होते. ते आरक्षण परत मिळवून द्यावे, ही आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी होती व पोलिसांनी घडवलेल्या हिंसाचारानंतरही याच मागणीसाठी अजूनही हे उपोषण सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -