घरक्राइम'तुझे पप्पा हातात रिव्हॉल्व्हर घेऊन'...; मदतीसाठी याचना करणारी रक्ताच्या थारोळ्यात दिसली

‘तुझे पप्पा हातात रिव्हॉल्व्हर घेऊन’…; मदतीसाठी याचना करणारी रक्ताच्या थारोळ्यात दिसली

Subscribe

ठाणे परिसरातील कळवा येथील बांधकाम व्यावसायिक दिलीप साळी (58) यांनी चारित्र्याच्या संशयावरून पत्नी प्रमिलावर गोळी झाडली होती

ठाणे : ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक साळवी यांनी त्यांच्या पत्नीचा गोळी झाडून केलेला खुन आणि त्यानंतर त्यांची आत्महत्या या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. मृतकांचा मुलगा प्रसाद साळवी यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनंतर नवनवीन खुलासे समोर येत आहेत.(‘Your papa with a revolver in his hand’…; She was seen begging for help in a pool of blood)

ठाणे परिसरातील कळवा येथील बांधकाम व्यावसायिक दिलीप साळी (58) यांनी चारित्र्याच्या संशयावरून पत्नी प्रमिलावर गोळी झाडली होती. ही घटना 1 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता दरम्यान घडली होती. मात्र घटनेच्या पाच मिनिटाआधी म्हणजेच वाजून 54 मिनिटांच्या सुमारास प्रमिला यांनी कळव्यातीलच मनीषा नगरातील तरण तलावाजवळील न्यू भाग्यदीप इमारतीमध्ये आपल्या कार्यालयीत असलेला मुलगा प्रसाद याला मोबाइलद्वारे आपल्यासमोरील जीवघेण्या संकटाची माहिती दिली आहे.

- Advertisement -

काय म्हटले होते प्रमिला साळवी

प्रमिला साळवी यांनी त्यांचा मुलगा प्रसाद साळवी (24) यास फोदन करून तुझे पप्पा हातात रिव्हॉल्व्हर घेऊन मला मारण्यासाठी अंगावर येऊन जोरजोरात भांडण करीत आहेत. असा फोन करून प्रसादकडे याचना केली होती.

हेही वाचा : नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भारत करतोय प्रगती; विदेशी मीडियांनी केले मोदींचे कौतुक

- Advertisement -

प्रसाद घरी पोहचला आणि आई-वडील रक्ताच्या थारोळ्यात दिसले

गोळी झाडल्याचा आवाज ऐकून शेजारी आणि नातेवाईक साळवी यांच्या घरी धावले. घरामध्ये प्रमिला या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तर दिलीप यांचाही मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी कळवा रुग्णालयात पाठवले. यावेळी घरी आलेल्या मुलगा प्रसादला आई-वडील रक्ताच्या थारोळ्यातच दिसले.

हेही वाचा : रस्त्यांवरून जुंपली! महापालिका म्हणते खड्डे आम्ही बुजवायचे आणि महसूल तुमच्या खिशात; MMRDA, MSRDC ला सुनावलं

संशयाने केला घात

कळव्यातील कुंभार आळी परिसरातील यशवंत निवास येथे साळवी कुटुंब राहते. दिलीप हे पेशाने बांधकाम व्यावसायिक आणि ठाण्याचे माजी महापौर गणेश साळवी यांचे मोठे बंधू आहेत. शुक्रवारी पती-पत्नीमध्ये काही कारणातून वाद झाला. हा विकोपाला गेला आणि दिलीप यांनी पत्नी प्रमिला हिच्यावर गोळी झाडली. त्यानंतर दिलीप यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. मात्र हा सगळा प्रकार संशयातून झाल्याने पत्नीवर संशयाने कुटुंबाचा घात केल्याची चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -