घरक्राइमDomestic Violence : बारामतीत विवाहितेचा हुंड्यासाठी छळ; पाण्यात बुडवून मारले

Domestic Violence : बारामतीत विवाहितेचा हुंड्यासाठी छळ; पाण्यात बुडवून मारले

Subscribe

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, राज्यात महिला व मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच काही दिवसांपासून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेतही वाढ झाली आहे. तर आता पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथे हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून तिला ठार करण्यात आले आहे.

बारामती (पुणे) : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्हा या ना त्या कारणाने चर्चेत असतोच. परंतु मागील काही दिवसांपासून हाच जिल्हा आता गुन्हेगारीमुळे ओळखल्या जाऊ लागला आहे. अशातच झपाट्याने विकसीत होत असलेल्या बारामती शहरातीह आता कौटुंबिक हिसांचाराने डोकं वर काढलं असून, बारामतीत विवाहितेचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला आहे. एवढेच नाही तर विवाहितेचे हात बांधून तिला पाण्यात बुडवून मारल्याची घटना समोर आली आहे. (Domestic Violence Harassment of married women for dowry in Baramati Killed by drowning in water)

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, राज्यात महिला व मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच काही दिवसांपासून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेतही वाढ झाली आहे. तर आता पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथे हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून तिला ठार करण्यात आले आहे. सुरेखा भाऊसाहेब गडदरे अस मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघाविरुद्ध खुनाचा व हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून, पती, सासू, नणंद व नंणदेचा पती या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : फिर्यादीच निघाला आरोपी; महामार्गावर वाहने अडवून रस्तेलूट करणारे दरोडेखोर जेरबंद

लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा न मिळाल्याने उचलले टोकाचे पाऊल

आपल्या देशात हुंडा घेणे आणि देणे गुन्हा असून, हुंडा प्रथा रोखण्यासाठी हुंडा प्रतिबंधक कायदाही आहे. असे असले तरी आजही हुंडा घेतल्या जात असल्याचे चित्र आहे. अशीच एक घटना बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथे घडली. लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा मिळाला नसल्यानं सासरच्या लोकांनी सुरेखा गडदरे या विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करत केला. तर तिला शेततळ्यात बुडवून ठार केले. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासु ठकुबाई महादेव गडदरे, नणंद आशा कोकरे व तिचा पती सोनबा कोकरे या चौघां विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

- Advertisement -

हेही वाचा : Fire News : मुंबईतील आगीच्या घटनांचे सत्र थांबेना, चेंबूरमधील निवासी इमारतीत अग्नितांडव

हात बांधून शेततळ्यात बुडवले

मासाळवाडी येथील भगवान गडदरे यांच्या शेतातील शेततळ्यात त्यांची विवाहित मुलगी सुरेखा भाऊसाहेब गडदरे हिचा मृतदेह आढळून आला. आरोपींनी तिच्या घराशेजारी असलेल्या शेततळ्यामध्ये सुरेखा हिचे दोन्ही हात बांधून तिला शेततळ्यात बुडवून मारले अशी फिर्याद तिचे वडील करगळ यांनी पोलिसांकडे दिली त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. इतक्या क्रूरपणे हुंड्यासाठी सुनेला मारणाऱ्या निर्दयी आरोपींना कडक शिक्षा करावी, अशी मृत मुलीच्या कुटुंबाची मागणी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -