घरमहाराष्ट्रआमच्या दबावामुळे सरकारने दुष्काळ जाहीर केला - काँग्रेस

आमच्या दबावामुळे सरकारने दुष्काळ जाहीर केला – काँग्रेस

Subscribe

राज्य सरकारने १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाचे राजकारण सुरु झाले आहे.

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता त्याचे श्रेय घेण्यासाठी सगळेच पुढे सरसवाले असून, काँग्रेस देखील यात मागे राहिलेली नाही. जनसंघर्ष यात्रेच्या दबावामुळे सरकारला दुष्काळ जाहीर करावा लागला. हे जनसंघर्ष यात्रेचे यश असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. राज्य सरकारने अखेर १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, ११२ तालुक्यामध्ये गंभीर तर ३९ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. यावर अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली.

बाकीच्या ५० तालुक्यात दुष्काळ कधी जाहीर करणार

राज्यात २०१ तालुक्यातील २० हजार गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. सरकारने फक्त १५१ तालुक्यातच दुष्काळ जाहीर केला आहे. बाकीच्या ५० तालुक्यात दुष्काळ केव्हा जाहीर करणार? असा सवाल देखील अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. तसेच फक्त दुष्काळ जाहीर करून चालणार नाही तर दुष्काळी उपाययोजना तात्काळ कराव्या लागतील. चारा छावण्या सुरु कराव्यात. शासकीय वसुली थांबवावी. वीजबिल माफ करावे. मागणीप्रमाणे टँकर सुरु करावेत अशी मागणी देखील त्यांनी केली.

- Advertisement -

तसेच या सरकारचा मागील अनुभव चांगला नाही हे फक्त घोषणा करतात अंमलबजावणी नाही असे देखील ते म्हणालेत. तसेच दुष्काळी जनतेला मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारवर दबाव कायम ठेवेल, असे सांगितले.

हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या – धनंजय मुंडे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकारने केलेल्या पहिल्या पाहणीच्या आधारे प्राप्त झालेल्या अहवालानुसार १८० तालुक्यात गंभीर दुष्काळ असल्याचे निदर्शनास आले असताना सरकारने १५१ तालुक्यामध्येच दुष्काळ जाहीर केला असून, वगळलेले २९ तालुके कोणत्या निकषाआधारे वगळले ? असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला असून, हे केवळ २९ नव्हे तर शंरभरावर तालुके दुष्काळी मदतीपासून वंचित राहणार असल्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

दुष्काळी भागातील जनतेचे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असल्याने तातडीने रोजगार हमी योजनेचे कामे सूरू करावीत, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे केवळ परिक्षा शुल्क माफ न करता संपुर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावे, २०१३-१४ च्या नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकारने एनडीआरएफचे निकष बाजुला घेऊन हेक्टरी २५ हजार रूपये मदत दिली होती, यावेळचा अभूतपवूर्व दुष्काळ असल्याने हेक्टरी ५० हजार रू. मदत द्यावी, दुष्काळी भागात तातडीने जनावरांच्या दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या मुंडे यांनी केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -