घरमहाराष्ट्रकोल्हापूर बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प; आंदोलनात सर्वसामान्य मैदानात

कोल्हापूर बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प; आंदोलनात सर्वसामान्य मैदानात

Subscribe

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आजचा नववा दिवस असून, अद्यापही या उपोषणावर तोडगा निघालेला नाही

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रातून केल्या जात आहे. तर 5 सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांसह समाजातील विविध घटकांनी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. काल पाळलेल्या या बंदमुळे कोल्हापूरमधील तब्बल 300 कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे.(Due to the Kolhapur bandh, the turnover of crores stopped; In the general field in the movement)

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आजचा नववा दिवस असून, अद्यापही या उपोषणावर तोडगा निघालेला नाही. यादरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रकारचे मोर्चे, आंदोलने, बंद तर कोठे रास्तारोको केल्या जात आहे. अशातच 5 सप्टेंबर रोजी मराठा समाज बांधवानी दिलेल्या बंदच्या हाकेला व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. यामुळे मात्र, कोल्हापूर आणि जिल्ह्यातील 300 कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल थांबल्याचे पहायला मिळाले.

- Advertisement -

कारखान्यातील धडधड बंद

पाच सप्टेंबर रोजी कोल्हापूरमध्ये दिलेल्या बंदच्या हाकेल्या समाजातील सर्वच घटकांनी प्रतिसाद दिला. यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांसह औद्योगिक वसाहतींमधील बहुतांश कारखान्यांतील यंत्रांची धडधड बंद होती. सोमवारी दसरा चौकात ‘जबाव दो’ आंदोलन करून मंगळवारी कोल्हापूर बंद पुकारला. त्याला प्रतिसाद म्हणून व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती.

हेही वाचा : ONE NATION ON ELECTION हा एक फ्रॉड; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

- Advertisement -

बाजारपेठेत शुकशुकाट

मराठा समाजाने पुकारलेल्या बंदमुळे कोल्हापूरमधील प्रसिद्ध बाजारपेठेत दिवसभरात कुणीच फिरकले नाही. पाच सप्टेंबर रोजी लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार, शाहूपुरी, राजारामपुरी, महाद्वाररोड, लक्ष्मीरोड, शिवाजीरोड, बाजारगेट, लुगडी ओळ, पापाची तिकटी, महापालिका परिसर आदी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता.

हेही वाचा : चोरांचे सरदार दिल्लीत सरकार चालवत आहेत…, ठाकरे गटाचे भाजपावर जोरदार टीकास्त्र

रुग्णांना त्रास होणार नाही याची घेतल्या गेली काळजी

कोल्हापूरमध्ये जरी पाच सप्टेंबर रोजी बंद पाळल्या गेला असला तरी यावेळी मात्र, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईंकाना त्रास होणार नाही याबाबत काळजी घेण्यात आली. यावेळी शहर आणि परिसरातील औषध दुकाने सुरू होती. दरम्यान, सायंकाळी पाचनंतर शहर आणि उपनगरातील काही दुकाने पूर्ववत सुरू झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -