घरमहाराष्ट्रराज्यातील 'या' नदीचे पात्र ऐन पावसाळ्यात झाले कोरडे

राज्यातील ‘या’ नदीचे पात्र ऐन पावसाळ्यात झाले कोरडे

Subscribe

मुंबई : राज्यभरात पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक नदी, धरणे, तलाव कोरड पडली आहेत. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पाण्याच्या समस्येचा नागरिकांना सामना करावा लागत आहेत. पाण्याच्या आभावी पिके करपण्याची वेळ आली आहे. यामुळे बळीराजा हा हवालदिली झाला आहे.

गेल्या वर्षी अवकाळी पावसाने बळीराजा संकटात साडला असताना. आताच पावसाच्या गैरहजरीने शेतातील उभे पिक करपण्याची वेळ आली आहे. तर मराठवाड्यात पावसाने दाडी मारल्याने खरीप पिके वाळू नगेली आहेत. तर यंदा धरणात देखील आवश्यक तेवढा पाणीसाठा उपलब्ध नाही आणि मराठवाड्याची तहान भागवणारी गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. यापूर्वी नदीचे पात्र हे पाण्याने भरलेले असायचे. पण आता नदी पात्र कोरडे असल्याने राठवाडा हा दुष्काळासदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …या मोदींच्या फक्त थापाच थापा, ठाकरे गटाची केंद्र सरकारवर बोचरी टीका

जायकवाडी धरण

यापूर्वी हजारो जनावरे हे गोदावरीच्या पात्रात पाणी पिण्यासाठी येत होती. पण आता नदी पात्र कोरडे पडल्याने हजारो जनावरे हे नदीच्या पात्रातून पाण्यासाठी पायपीट करत आहेत. यंदा मराठावाड्यातील जायकवाडी धरणात 33 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर गेल्या वर्षी 94 टक्के पाणीसाठा होता.यंदा राज्यात जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. पण ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतील. यामुळे राज्यातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -