घरमहाराष्ट्रयंदा दिवाळीत पर्यावरणपूरक फटाके फोडा; केंद्र सरकारचा उपक्रम

यंदा दिवाळीत पर्यावरणपूरक फटाके फोडा; केंद्र सरकारचा उपक्रम

Subscribe

या पर्यावरणपूरक फटाक्यांमुळे प्रदूषणही होणार नाही आणि दिवाळीतील आतिषबाजीचा आनंदही कायम राहिल

दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आतिषबाजी आली आणि त्यासोबतच होणारं प्रदूषणही आलं. पण, यंदाच्या दिवाळीत तुम्हाला फटाके फोडण्याचा आनंद पुरेपूर लुटता येणार आहे. कारण, केंद्र सरकारने पर्यावरणपूरक फटाके उपलब्ध करून दिले आहेत. ज्यामुळे प्रदूषणही होणार नाही आणि दिवाळीतील लोकांचा आनंदही कायम राहण्यास मदत होईल. सोबतच केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे प्रदुषणाबाबतची चिंता करण्याची गरज भासणार नाही. केंद्र सरकारकडून यंदा बाजारात ग्रीन फटाके उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आतिषबाजीचा आनंद कायम राहावा यासाठी केंद्र सरकारकडून ग्रीन फटाकेचा उपक्रम राबवला जात आहे.

असे ओळखा पर्यावरणपूरक फटाके 

काऊन्सिल ऑफ सायन्टेफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्चने (CSIR) ने या ग्रीन फटाक्यांची निर्मिती केली आहे. यामध्ये आवाज करणारे फटाके, पाऊस, पेन्सिल, चक्करी आणि फुलबाज्या अशा विविध फटाक्यांचा समावेश आहे. हे फटाके सीएसआयआरने विकसित केलेल्या नव्या फार्म्युलेशनवर आधारित आहे. बाजारात हे फटाके उपलब्ध करून देण्यात आले असून या फटाक्यांवर ग्रीन लोगो आहे, तसंच क्युआर कोडदेखील आहे. जेणेकरून नकली फटाके ओळखण्यास मदत होईल. आतापर्यंत ज्या दरात फटाके मिळत होते, त्याच दरात हे फटाकेदेखील मिळतील, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

- Advertisement -

या फटाक्यामुळे प्रदूषणही नाही,आतिषबाजी कायम

याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, “ प्रत्येक जण दिवाळीची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. न्यायालयाच्या आदेशानुसार फटाक्यांवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे अनेक जण निरुत्साही झाले होते. दिवाळीतील लोकांचा उत्साह कायम कसा ठेवावा यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि ग्रीन फटाक्यांची निर्मिती करण्यात CSIR ला यश मिळालं, याचा खूप आनंद वाटतो आहे. या पर्यावरणपूरक फटाक्यांमुळे प्रदूषणही होणार नाही आणि दिवाळीतील आतिषबाजीचा आनंदही कायम राहिल. ”


दसऱ्याच्या दिवशी सोन्याचा भाव वाढला; १० वर्षातील उच्चांकी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -