घरअर्थजगतयेस बँक घोटाळाप्रकरणी मुंबईत ईडीचे छापे

येस बँक घोटाळाप्रकरणी मुंबईत ईडीचे छापे

Subscribe

येस बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मुंबईतील जागतिक पर्यटन व ट्रॅव्हल कंपनी ‘कॉक्स अँड किंग्स’ या संस्थेच्या पाच कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी छापे टाकले.

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर तपास यंत्रणा देखील कामाला लागली आहे. बँकिंग क्षेत्रात गाजलेल्या येस बँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज सोमवारी मुंबईत बँकेच्या कर्जदारांवर छापे टाकले. येस बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मुंबईतील जागतिक पर्यटन व ट्रॅव्हल कंपनी ‘कॉक्स अँड किंग्स’ या संस्थेच्या पाच कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी छापे मारले. अचानक छापे मारल्याने संशयितांमध्ये धडकी भरली.

दोन महिन्यांहून अधिकच्या लॉकडाऊनमधून मुंबइची सुटका झाली. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर प्रशासन आणि इतर यंत्रणा कार्यरत झाली. याची प्रचिती ईडीच्या कामातून दिसून आली. येस बँकेतून मोठी कर्जे घेतलेल्या कंपन्या ‘ईडी’च्या रडारवर आहेत. आज पर्यटन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘कॉक्स अँड किंग्ज’ या कंपन्यांच्या मुंबईतील कार्यालयांवर ईडीने छापे टाकले. ‘कॉक्स अँड किंग्ज’च्या पाच कार्यालयांची आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. या आधी मार्च महिन्यात ईडीने ‘कॉक्स अँड किंग्ज’चे प्रवर्तक पीटर केरकर यांना समन्स बजावण्यात आला होता. ‘प्राइसवॉटर कूपर्स’ने फेब्रुवारीत केलेल्या फॉरेन्सिक ऑडीटमध्ये ‘कॉक्स अँड किंग्ज’ने घेतलेली कर्जे संशयास्पद असल्याचं आढळून आलं होतं. तसंच २१००० कोटींचा निधी संशयास्पदरित्या वळवला असल्याचं तपासात आढळलं. दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात कॉक्स अँड किंग्जचं शहरातील मुख्य कार्यालय आहे. यासह चार आणखी कार्यालयात आज ईडीच्या तपास पथकांनी छापे टाकले. ‘कॉक्स अँड किंग्ज’ने येस बँकेतून २२६० कोटींचं कर्जे घेतलं आहे. या व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शरीराच्या या भागापासून कोरोनाचा धोका सर्वाधिक, दुर्लक्ष करू नका


आर्थिक अनियमितता आणि वारेमाप कर्ज वाटप यामुळे रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर ५ मार्च रोजी निर्बंध लागू केले होते. मात्र त्यानंतर टप्याटप्याने ते शिथिल करत येस बँकेचे व्यवहार पूर्ववत केले होते. मात्र बड्या उद्योगांना दिलेले कर्जे बुडीत खात्यात गेल्याने बँकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. हा घोटाळा उघड झाल्यानंतर येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -