घरताज्या घडामोडीधक्कादायक! कोरोनामुक्त झाल्याने नगरसेवकाची कंटेन्मेंट झोनमधून मिरवणूक

धक्कादायक! कोरोनामुक्त झाल्याने नगरसेवकाची कंटेन्मेंट झोनमधून मिरवणूक

Subscribe

कोरोनामुक्त झालेल्या नगरसेवकाची कंटेन्मेंट झोनमधून मिरवणूक काढण्यात आली असून याप्रकरणी नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे.

देशात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय प्रशासन, पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत. दरम्यान, आतापर्यंत देशात कोरोनामुळे सात हजारांहून लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. मात्र, कोरोनाविषयीचे गांभीर्य लोकं विसरायला लागले असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

बंगळुरुमधील पदरायनपुरा वार्डाचे नगरसेवक इम्रान पाशा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून ते आता कोरोनामुक्त झाले आहेत. परंतु, उपचारानंतर कोरोनामुक्त बरे झालेल्या पाशा यांची रुग्णालयातून घरापर्यंत रविवारी मर्सिडिज कारमधून रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे कंटेनमेंट झोनमधून ही रॅली काढण्यात आली आहे. यावेळी म्हैसूर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच त्यांना अटक करण्यात आली.

- Advertisement -

आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाशा यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना बंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर बंगळुरूचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी परिसराला भेट दिली आणि पदरायणपुरा परिसरात पाच दिवसांसाठी निर्बंध लागू केले. त्याचबरोबर राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्याही परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत.

‘पोलिसांनी इम्रान पाशा यांना आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे’. – भास्कर राव; बंगळुरूचे पोलीस आयुक्त

- Advertisement -

हेही वाचा – केजरीवाल यांच्यात आढळली कोरोनाची लक्षणे, कोरोना चाचणी होणार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -