घरमहाराष्ट्र...तर ईडीनं आधी अयोध्या जमीन घोटाळ्याची चौकशी करावी - संजय राऊत

…तर ईडीनं आधी अयोध्या जमीन घोटाळ्याची चौकशी करावी – संजय राऊत

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरावर ईडीने सकाळी छापे टाकले. यावर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना या छापेमारीचा निषेध केला. तसंच जमिनीचे व्यवहारच जर तुम्हाला कुणाचे काढायचे असतील तर ईडीनं आधी अयोध्या जमीन घोटाळ्याची चौकशी करावी असं देखील राऊत म्हणाले.

“जमिनीचे व्यवहारच जर तुम्हाला कुणाचे काढायचे असतील तर अयोध्येतील महापौर ऋषीकेश उपाध्याय यांच्या नातेवाईकांनी राम जन्मभूमी न्यासाबरोबर केलेला जमिनीचा व्यवहार ही ईडी आणि सीबीआयसाठी अत्यंत योग्य प्रकरण आहे. मला वाटतं तिथे सुद्धा केंद्रीय तपास यंत्रणांनी तिथे जाऊन तपास करणं गरजेचं आहे,” असं राऊत म्हणाले. “महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनीच कशाला तर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने ठराव केला पाहिजे की अयोध्यामध्ये जो जमीन घोटाळा स्पष्ट दिसतोय, त्यासंदर्भात सीबीआय आणि ईडीने तपास करावा,” असा सल्ला देखील राऊत यांनी भाजपला दिला.

- Advertisement -

सीबीआय, ईडी यांचे कार्यकर्ते आहेत का?

या सगळ्या गोष्टींमुळे सीबीआयचा ठराव झाला त्याचं आश्चर्य आहे. सीबीआय इडी काय यांच्या पार्टीचे आहेत. या यंत्रणांचं अवमुल्यन होतंय. न्यायलय आहे, हे कुठेतरी थांबायला हवं. हे सगळे सत्ताप्रेरित आहे. सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ता आहे का? इडी आणि सीबीआयची बदनामी होतेय. तसंच यंत्रणांचा वापर करून कुणाला वाटत असेल की सत्ता मिळेल तर ते अंधारात चाचपडत आहे. सरकारला दोन वर्ष होत आली. पुढील तीन वर्ष उद्धव ठाकरे यांचच सरकार चालणार आहे, असं राऊत म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -