घरमहाराष्ट्रअनिल देशमुखांच्या मुलाला ईडीचं समन्स; ऋषिकेश देशमुख उद्या चौकशीला हजर राहण्याची शक्यता

अनिल देशमुखांच्या मुलाला ईडीचं समन्स; ऋषिकेश देशमुख उद्या चौकशीला हजर राहण्याची शक्यता

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुलगा ऋषिकेश देशमुख याला ईडीने मनी लाँड्रिंग प्रक्रिया समन्स बजावलं आहे. ईडीने ऋषिकेश देशमुख यांना उद्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख सध्या ईडीच्या कोठडीमध्ये आहेत.

ईडीने पाच वेळा समन्स बजावून देखील चौकशीला गैरहजर राहणारे अनिल देशमुख सोमवारी १ नोव्हेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर झाले. त्यानंतर त्यांची तब्बल सडे बारा तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. दरम्यान आता त्यांच्या मुलाला ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख हे उद्या शुक्रवारी ईडी कार्यालयात जाणार असल्याची शक्यता आहे.

- Advertisement -

ईडीच्या वकिलांनी न्यायालयात जे मुद्दे मांडले त्यानुसार अनिल देशमुख यांना ४ कोटी ७० लाख रुपये बार सुरू ठेवण्यासाठी मिळाले होते. ते त्यांनी ऋषिकेश देशमुख यांना दिले. त्यानंतर दिल्लीतील पेपर कंपनीच्या माध्यमातून हा पैसा पुन्हा श्री साई शिक्षण संस्थेकडे दानाच्या माध्यमातून आला. या गुन्ह्यात परदेशी व्यक्तींचा सहभाग नाकारता येत नाही.

एका गुप्त व्यक्तीच्या जबाबात असं सांगण्यात आलंय की, ऋषिकेश देशमुख एका अशा व्यक्तीच्या शोधात होता जो रोख रक्कम घेवून ट्रस्ट मध्ये दान करेल. नागपुरहून रोकड हवालाच्या माध्यमातून दिल्लीला पाठवली जायची आणि ऋषिकेश देशमुख याची सर्व व्यवस्था पहायचा, असाही संशय ईडीने व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -