घरमहाराष्ट्रईडीची पुढची कारवाई नांदेडच्या नेत्यावर?, चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा

ईडीची पुढची कारवाई नांदेडच्या नेत्यावर?, चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा

Subscribe

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा हस्तक्षेप वाढत असल्याचा आरोप मविआच्या नेत्यांनी वारंवार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि नेते ईडीच्या रडारवर आहेत. दरम्यान, आता काँग्रेसचे नेते ईडीच्या रडारवर येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नांदेडमध्ये केलेलं सूचक वक्तव्य निमित्त ठरलं आहे.

चंद्रकांत पाटील नांदेडमध्ये देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांना ईडी किंवा आयकर विभागाची कारवाई नांदेडच्या नेत्यांवर होणार का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला. त्यावेळी त्यांनी स्मितहास्य केलं. मी काही त्या तपास यंत्रणांचा अधिकारी नाही आहे. पण माझ्या हसण्यावरुन काय समजायचं ते समजा, असा सूचक इशारा दिला. मात्र, चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. चंद्रकांत पाटलांचा रोख नेमका कोणावर आहे? कोणत्या नेत्यावर आता कारवाई होणार? यावरुन चर्चांना उधाण आलं आहे.

- Advertisement -

देशमुखांचा जामीन नाकारला म्हणजे दाल मे कुछ काला है

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन न्यायालयाने नाकारला, याचा अर्थ दाल में कुछ काला है असं चंद्रकांत पाटील म्हणाले. अनिल देशमुखांची ३४० कोटींची मालमत्ता जप्त झाली. एका मोठ्या नेत्यांच्या कुटुंबियांवर आयकर विभागानं धाड टाकली त्यात १८२ कोटी जप्त केले. जर काही नव्हतच तर काही सापडायला नको होतं. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना जामीन फेटाळला. ईडी, सीबीआयने कारवाई केली पण न्यायालयानं जामीन दिला नाही याचा अर्थ दाल मे कुछ काला है, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -