घरमहाराष्ट्रEknath Khadse : रोहित पवारांच्या टीकेला एकनाथ खडसे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

Eknath Khadse : रोहित पवारांच्या टीकेला एकनाथ खडसे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

Subscribe

एकनाथ खडसे अटकेच्या भितीने पुन्हा भाजपामध्ये परतले आहेत, असा आरोप रोहित पवारांनी केला होता. पवारांच्या या टीकेला आता एकनाथ खडसे यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये थेट दिल्लीला जाऊन खडसे पुन्हा एकदा घरवापसी करणार आहेत. पण याच मुद्द्यावरून रोहित पवारांनी खडसे यांच्यावर निशाणा साधला होता. एकनाथ खडसे अटकेच्या भितीने पुन्हा भाजपामध्ये परतले आहेत, असा आरोप रोहित पवारांनी केला होता. पवारांच्या या टीकेला आता एकनाथ खडसे यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे. (Eknath Khadse response to Rohit Pawar criticism)

रोहित पवारांच्या टीकेला उत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले की, माझी भाजपात प्रवेश करण्याची इच्छा होती. भाजपात प्रवेश करणे मला नवीन नाही. मी गेल्या 40 वर्षांपासून भाजपासाठी काम करत आलो आहे. त्याच जोमाने भाजपाचे काम करावे म्हणून मी भाजपात जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून, त्यांच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून देशाच्या उन्नतीसाठी आणि देशाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी मी भाजपात जात आहे, असे खडसे यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा… Nana Patole : नाना पटोलेंच्या गाडीला धडक देणारा ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

तसेच, भाजपामध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता. पण भाजपामध्ये जुने कार्यकर्ते आणि नेत्यांशी चर्चा करत असताना तुम्ही पक्षात परत आले पाहिजे. तुम्ही परत आले तर बरे होईल, अशी चर्चा आमची आणि वरिष्ठांमध्ये होती. हे काय आजचे नव्हते. गेल्या चार ते सहा महिन्यांपासून त्यांनी अशाप्रकारची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून चर्चा सुरू होती, अशी माहिती याआधीच एकनाथ खडसे यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्याभरापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, याबाबत स्वतः खडसे यांच्याकडूनच प्रसार माध्यमांना माहिती देण्यात आली. प्रसार माध्यमांसमोर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मी भेट घेतली. भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मी भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. तर, येत्या काही दिवसांच्या आत हा प्रवेश व्हावा, अशा स्वरुपाचा माझा प्रयत्न आहे, असेही खडसे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षांतील कामांचा जगभरात प्रभाव – फडणवीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -