घरताज्या घडामोडीNana Patole : नाना पटोलेंच्या गाडीला धडक देणारा ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

Nana Patole : नाना पटोलेंच्या गाडीला धडक देणारा ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे. सुदैवाने मोठी घटना टळली असून, नाना पटोले थोडक्यात बचावले आहेत. या अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पुढील अधिक तपास सुरू केले.

भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे. सुदैवाने मोठी घटना टळली असून, नाना पटोले थोडक्यात बचावले आहेत. या अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पुढील अधिक तपास सुरू केले. विशेष म्हणजे पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. (Nana Patole The truck driver who hit Nana Patole car is in police custody)

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पटोलेंच्या गाडीला मंगळवारी रात्रीच्या सुमारास अपघात झाला. या अपघातानंतर नाना पटोलेंनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले. अखेर पोलिसांनी त्या ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. या ट्रक चालकाची पोलीस सध्या अधिक चौकशी करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणात अशी परिस्थिती… देवेंद्र फडणवीस का म्हणाले असं?

अपघातानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

“काल रात्री भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर येथील प्रचारसभा संपवून राहत्या गावी सुकळी येथे जाताना भिलेवाडा जवळ माझ्या गाडीचा भीषण अपघात झाला. ट्रकचालकाने मुद्दामहून माझ्या वाहनाला कट मारला. या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न? याची चौकशी आता पोलीस करतील. आपल्या सर्वांच्या सदिच्छा, प्रेम व परमेश्वराच्या कृपेने मी सुखरूप आहे. काळजी नसावी”, असे नाना पटोले यांनी म्हटले.

- Advertisement -

नाना पटोलेंच्या गाडीचा नेमका कसा झाला अपघात?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे. मंगळवारी नाना पटोले हे आपला सुनिश्चित प्रचारसभा आटपून सुकळी या गावी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या उभ्या गाडीला जोराची धडक दिली. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने मोठी घटना टळली असून, नाना पटोले थोडक्यात बचावले आहेत. या अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत पुढील अधिक तपास सुरू करत ट्रक चालकाला ताब्यात घेतले. मात्र, या अपघातानंतर सध्याच्या राजकारणात अनेक तर्क-वितर्क आणि शंका निर्माण केल्या जात आहेत.


हेही वाचा – Nana Patole Car Accident : विरोधकांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का? काँग्रेसचा सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -