घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षांतील कामांचा जगभरात प्रभाव...

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षांतील कामांचा जगभरात प्रभाव – फडणवीस

Subscribe

नागपूर : 10 वर्षांत या देशातील 25 कोटी लोकांना गरिबी रेषेवर आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जगातले लोकं विचार करत असून, अर्थशास्त्र म्हणतात की हे शक्य झालं, पंतप्रधान मोदींनी असा काय चमत्कार केला, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्या मागील 10 वर्षांतील कामाचा पाढा वाचला. नागपूरातील कन्हानमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले आहेत. मात्र, मोदींच्या सभेपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधिक केले. (Lok Sabha Election 2024 DCM Devendra Fadnavis Talk On PM Narendra Modi Work In Last 10 Years)

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागील 10 वर्षांत बदललेला भारत पाहायला मिळाला. 10 वर्षांत पंतप्रधा मोदी यांनी केलेला चमत्कार आपण पाहतो आहे. 10 वर्षांत या देशातील 25 कोटी लोकांना गरिबी रेषेवर आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जगातले लोकं विचार करत असून, अर्थशास्त्र म्हणतात की हे शक्य झालं, पंतप्रधान मोदींनी असा काय चमत्कार केला. ज्यामुळे 25 कोटी लोकांना गरिबी रेषेवर आले”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : नो बर्वे ओन्ली पारवे म्हणत फडणवीसांचा नागपुरातून मविआला टोला

“पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन तयार केले आहे. मोदींनी सांगितले होत की, खाणार नाही आणि खाऊ देणार नाही. जनतेचा एक-एक रुपया जनतेपर्यंत पोहोचवला जाईल. गरीबी हटावचा केवळ नारा नाही तर, गरीबाच्या जीवनात परिवर्तन करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मागील 10 वर्षांत 20 कोटी लोक जे झोपडीत राहत होते, जे आता पक्क्या घरात राहत आहेत. 50 कोटी लोकं असे आहेत, ज्यांच्या घरी महिलांना हंडे घेऊन पाणी भरण्यासाठी जावं लागत होते. पण त्याच महिलांच्या घरी आता मोदींनी नळ पोहचवला. पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचवले आहे. मोदींना गरीब माणसाला अधिकार दिला”, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

- Advertisement -

“एवढंच नाही तर या देशातील 50 कोटी लोकांना मुद्रा लोन देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. विशेष म्हणजे यामध्ये 31 कोटी केवळ महिला आहेत. 31 कोटी महिला आज त्यांच्या पायावर उभे आहेत. 2014 पासून परिवर्तन झाल्यापासून विदर्भात विकास झाला. समृद्धी महामार्ग आम्ही केला. समृद्धी महामार्ग आता भंडारा-गोंदियामध्ये नेणार आहोत. आता मिहानसारखा प्रकल्प आणून मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध करणार आहोत. समृद्धीप्रमाणे आता शक्तिपीठ महामार्गाचे काम आपण हाती घेतले आहे. नागपूर ते गोवा असा हा शक्तिपीठ महामार्ग आहे. या महामार्गातून नागपूरला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे”, असेही फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – MNS IN MAHAYUTI : राज ठाकरेंच्या भूमिकेला एकमेव आमदाराचा पाठिंबा; म्हणाले, उंची छलांग लगाने के लिये…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -