घरताज्या घडामोडीElection Commission : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरही निवडणूक आयोग ठाम; इलेक्शन ड्युटी टाळणाऱ्या...

Election Commission : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरही निवडणूक आयोग ठाम; इलेक्शन ड्युटी टाळणाऱ्या शिक्षकांवर कारवाई

Subscribe

Lok Sabha Election 2024 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडव्यानिमित्त पाडवा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडून शिक्षकांवर लावण्यात येणाऱ्या इलेक्शन ड्युटीवर भाष्य केले. त्यावेळी शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना शिकवण्याचे असते, त्यामुळे कोणत्याही शिक्षकाने इलेक्शन ड्युटीवर जाऊ नये, असे आव्हान राज ठाकरे यांनी केले.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडव्यानिमित्त पाडवा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडून शिक्षकांवर लावण्यात येणाऱ्या इलेक्शन ड्युटीवर भाष्य केले. त्यावेळी शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना शिकवण्याचे असते, त्यामुळे कोणत्याही शिक्षकाने इलेक्शन ड्युटीवर जाऊ नये, असे आव्हान राज ठाकरे यांनी केले. तसेच, एकाही शिक्षकाला कामावरून काढल्यास मनसे स्टाईल राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला इशारा दिला. मात्र या इशाऱ्यानंतही निवडणूक आयोग आपल्या भूमिकेवर ठाम असून जे शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी येणार नाहीत, त्या संबंधित ट्रेनिंग पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे. (election commission ready to take action on teachers government employees who absent for lok sabha election training camp after raj thackeray warning)

गुरूवारपासून निवडणुकीच्या कामासाठी ट्रेनिंग कँप सुरू होणार आहे. हे ट्रेनिंग कँप शिक्षकांसाठी असून या कँपला शिक्षकांची हजेरी बंधनकारक आहे. मात्र राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या ट्रेनिंग कँपला शिक्षकांनी जाऊ नये, असे आवाहन केले होते. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने जे शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी येणार नाहीत, त्या संबंधित ट्रेनिंग पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची भूमिका घेतली आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात तसे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Raj Thackeray : मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार! राज ठाकरेंची शिवतीर्थावरुन गर्जना

गुरूवारपासून सुरू होणाऱ्या ट्रेनिंग कँपवर न येणाऱ्यांनी कारवाईसाठी तयार राहावे, अशा शब्दांत निवडणूक आयोगाने शिक्षकांना सुनावल्याची समजते. विनाअनुदानित इंग्रजी शाळेतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून सुटका मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. पण त्या मागणीवर उच्च न्यायालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकांचे मुख्य काम सोडून त्यांना निवडणुकीच्या कामात जुंपले जात असल्याची तक्रार करत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी निवडणूक आयोगाने न्यायालयात आपले मत मांडले. शिवाय, काही दिवसांपूर्वी दादरमधील शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेत मुलांच्या भवितव्यासाठी शिक्षकांनी इलेक्शन ड्युटीतून मोकळं करण्याची मागणी केली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी त्या पालकांची मागणी ऐकत त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

दरम्यान, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी डॉक्टर, शिक्षक यांना निवडणूकीच्या कामात जुंपण्यास विरोध करत त्यांना अभय देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता केंद्रीय निवडणूक आयोग आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने मनसे यावर काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा – Raj Thackeray at Shivaji park : नरेंद्र मोदींना पाठिंबा पण…; राज ठाकरेंनी जाहीर केला लोकसभेनंतरचा अजेंडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -