घरदेश-विदेशLok Sabha Election 2024 : पोपट सांगतोय उमेदवाराचे भविष्य...मालकाला घेतले ताब्यात

Lok Sabha Election 2024 : पोपट सांगतोय उमेदवाराचे भविष्य…मालकाला घेतले ताब्यात

Subscribe

Lok Sabha Election 2024 : तामिळनाडूतील कोड्डालोर येथील एक प्रकरण समोर आले आहे. मंदिराबाहेर एक पोपट भविष्य सांगत होता. लोकसभेला उभ्या राहिलेल्या एका उमेदवाराने या पोपटाला आपण निवडणुकीत जिंकणार का, असा प्रश्न विचारला आणि पोपटाने उत्तर देखील दिलं. याचा व्हिडीओ काढला गेला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. आणि त्यानंतरच हा पोपट आणि त्याच्या मालकावर कारवाई करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे. त्याबरोबरच कोण जिंकून येणार याचे अंदाज बांधणे सुरू आहे. असेच अंदाज बांधल्याप्रकरणी तामिळनाडूत चक्क एका पोपटाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. वास्तविक, कारवाई पोपटाच्या मालकाविरोधात झाली आहे, पण कारणीभूत आहे तो पोपट. या पोपटाचा दोष एवढाच की, तो उमेदवारांचं भविष्य सांगत होता. (Lok Sabha Election 2024 fortune teller parrot told who is going to win in election police caught the owner)

तामिळनाडूतील कोड्डालोर येथे हा प्रकार घडला. मंदिराबाहेर हा पोपट भविष्य सांगत होता. लोकसभेला उभ्या राहिलेल्या एका उमेदवाराने या पोपटाला आपण निवडणुकीत जिंकणार का, असा प्रश्न विचारला आणि पोपटाने उत्तर देखील दिलं. याचा व्हिडीओ काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. आणि त्यानंतरच हा पोपट आणि त्याच्या मालकावर कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Narendra Modi : लोकशाही धोक्यात आहे असे सांगणाऱ्या विरोधकांना पंतप्रधान मोदींनी सुनावले खडेबोल

काय आहे प्रकरण? (What is the matter?)

चित्रपट दिग्दर्शक थंकर बचन हे येथून निवडणूक लढवत आहेत. बचन हे पीएमके अर्थात पट्टाली मक्कल काची पार्टीचे उमेदवार आहेत. रविवारी ते आपल्या मतदारसंघात प्रचारासाठी, लोकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी फिरत होते. तेथील एका प्रसिद्ध मंदिराला देखील त्यांनी भेट दिली. मंदिराच्या बाहेरच एक ज्योतिषी पिंजऱ्यात पोपट घेऊन बसला होता. समोर ठेवलेल्या कार्डांपैकी एखादे कार्ड उचलून तो पोपट समोर आलेल्यांचे भविष्य सांगत होता. बचन यांना देखील आपले भविष्य जाणून घ्यायची इच्छा झाली. आणि ते देखील त्या पोपटासमोर जाऊन बसले. उमेदवारालाच भविष्य जाणून घ्यायचे आहे म्हटल्यावर पोपटाला पिंजऱ्यातून बाहेर काढले. त्याच्या समोर अनेक कार्ड्स ठेवण्यात आली. त्यातलं एक कार्ड त्याला निवडायचं होतं. पोपटाने आपलं काम केलं आणि कार्ड मालकाकडे दिलं. त्या कार्डावर मंदिरातीलच देवाचा फोटो होता. आणि ते पाहिल्यावर मालकाने बचन निवडणुकीत नक्की विजयी होणार असल्याचं ठामपणे सांगितलं. या भविष्यवाणीने खुश झालेल्या बचन यांनी पोपटाला खाण्यासाठी फळं दिली. मात्र, हा सगळं प्रकार उपस्थितांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आणि मग सोशल मीडियावर व्हायरल देखील. पोलिसांपर्यंत प्रकरण पोहोचले, आणि पोलिसांनी पोपटाला अटक केली. तर पोपटाचा मालक सेल्वराज याला समज देऊन सोडण्यात आले. अशाप्रकारे पोपटाला पिंजऱ्यात ठेवल्याबद्दल वन विभागाने देखील सेल्वराज याला समज दिली. त्याच्याकडे आणखीही काही पोपट आढळले, त्यांना जंगलात सोडण्यात आले. या कारवाईनंतर पीएमकेने डीएमके सरकारवर टीका केली. (Lok Sabha Election 2024 fortune teller parrot told who is going to win in election police caught the owner)

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षांतील कामांचा जगभरात प्रभाव – फडणवीस

पोलीस कारवाईवरून सरकारवर टीका

आपली हार पचवण्याची ताकद नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याची टीका पीएमके अध्यक्ष डॉ. अंबुमणी रामदास यांनी या संपूर्ण प्रकरणावरून केली आहे. कुड्डालोर मतदार संघातून बचन विजयी होतील अशी भविष्यवाणी पोपटाने केली आहे, हे त्यांना सहन झालेले नाही. अशा प्रकारची कारवाई निंदनीय आहे. द्रमुक सरकार साधं पोपटाची भविष्यवाणी सहन करू शकत नाही, मग निवडणुकीचा निकाल कसा सहन करेल, असा चिमटा देखील त्यांनी काढला आहे. (Lok Sabha Election 2024 fortune teller parrot told who is going to win in election police caught the owner)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -