घरमहाराष्ट्रBHR घोटाळ्याच्या चौकशीवरुन नाथाभाऊंचा गिरीश महाजनांना टोला, म्हणाले...

BHR घोटाळ्याच्या चौकशीवरुन नाथाभाऊंचा गिरीश महाजनांना टोला, म्हणाले…

Subscribe

बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारप्रकरणाची चौकशी सुरु आहे. सरकारकडून होत असलेली चौकशी ही योग्य असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांना टोला देखील लगावला. माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर तो हा कसा राजकीय विषय असेल, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला. ते जळगाव येथे माध्यमांशी बोलत होते.

बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारप्रकरणाची चौकशी ही राजकीय हेतूने केली जात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना जळगाव बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात होत असलेली कारवाई ही राजकीय हेतूने केली जात आहे, असं नाही. या प्रकरणात कोणाची नावे आहेत, याची मला माहिती नाही. परंतु, या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी खडसेंनी केली.

- Advertisement -

बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात हजारो ठेवीदारांचा पैसा असुरक्षित झाल्याने अनेक संसार उध्वस्त झाले. त्यामुळे बहा राजकीय विषय नाही. ठेविदारांच्या संरक्षणाच्या हा विषय आहे. त्यामुळए या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच, असं खडसे म्हणाले. माझी यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आयकर विभाग, लोकायुक्त, दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी झाली आहे. आता सध्या ईडीकडून देखील चौकशी सुरू आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नसताना माझ्या एवढ्या चौकश्या होऊ शकतात. तो राजकीय विषय नव्हता तर आता बीएचआर प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो, अशा शब्दांत खडसे यांनी विरोधकांना टोला लगावला.

बीएचआर घोटाळ्यात गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय

र्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात राज्यभरात छापे टाकले. यावेळी १२ जणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या संशयितांमध्ये उद्योजक, व्यापाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी काहीजण भाजप नेते गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांपैकी असल्याचे समजते. या वृत्ताला गिरीश महाजन यांनी दुजोरा दिला. सगळेच माझे निकटवर्तीय आहेत. आमदार चंदू पटेल यांचे नावही त्यात आहे. या सर्वांनी कर्ज फेड केली असल्याचा दावा केला होता आहे. या प्रकरणी कायद्याप्रमाणे कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -