घरमहाराष्ट्रफडणवीसांच्या आरोपाला एकनाथ खडसेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, "भाजपने मला..."

फडणवीसांच्या आरोपाला एकनाथ खडसेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “भाजपने मला…”

Subscribe

एकनाथ खडसे हे भाजपची बदनामी करत असल्याता आरोप फडणवीसांकडून करण्यात आलेला होता. त्याला प्रत्युत्तर देत एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे. त्यांना मुख्यमंत्री पदापासून कशा पद्धतीने दूर ठेवण्यात आले. याबाबत देखील यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले.

“40 वर्ष अहोरात्र भाजपचे काम आम्ही केले. मेहनतीचे फळ म्हणून मला मंत्रिमंडळात चांगलं स्थान दिलं गेलं. भाजपने मला काहीच दिलं नाही असं मी कधीच म्हटलं नाही,” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे हे भाजपची बदनामी करत असल्याता आरोप फडणवीसांकडून करण्यात आलेला होता. त्याला प्रत्युत्तर देत एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे. त्यांना मुख्यमंत्री पदापासून कशा पद्धतीने दूर ठेवण्यात आले. याबाबत देखील यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले.

मी भाजपची बदनामी केली नाही…

ज्यांचं भाजपमध्ये काहीच योगदान नाही त्यांनाही आता चार-पाच खाती मिळतायत. आम्हाला सात खाती दिली, १० खाती दिली याचं फार कौतुक नाही. तो आमचा अधिकार होता. तुम्हाला मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून १०-१२ खाती घ्या म्हणून सांगितलं. स्पर्धकच कमी झाला पाहिजे म्हणून काय पाहिजे ते घ्या आणि मंत्रिमंडळात या असा विषय होता. मी भाजपची बदनामी केली नाही. असे म्हणत भाजपच्या कोणत्याही नेत्यावर किंवा कोणत्याही विषयावर मी काहीही बोललेलो नाही, असे यावेळी एकनाथ खडसे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

- Advertisement -

एक, दोन लोकांमुळे बदनामी होतेय…

“हे सर्व झाल्यानंतर माझा जो झळ सुरुये तो कोण करतंय? पडद्याच्या आडून ईडी, अँटी करप्शन लावायचं, इन्कम टॅक्स मागे लावायचं हे कोण करतंय हे सर्वांना माहित आहे. मी ४० वर्ष चोर, बदमाश नव्हतो, मग एकाच दिवसात दाऊदच्या पत्नीसोबतचा विषय, विनयभंगाचा गुन्हा दाखल करणं अशा अनेक गोष्टी घडल्या. जे एक दोन लोक आहेत त्यांच्यामुळे बदनामी होतेय, या प्रवृत्तींमुळे लोकं दूर गेले,” असे खडसेंकडून यावेळी सांगण्यात आले.

40 वर्ष पक्षाची हमाली केली…

“40 वर्ष हमाली केल्यानंतरही भाजपने ऐनवेळी माझे तिकिट कापले. त्यानंतर मला राष्ट्रवादीने आमदार केले. त्यामुळे मी राजकारणात आहे. माझा राग भाजपवर नव्हता आणि नाही हे मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो. तुम्हाला तसे वाटत असेल तर त्याचे उदाहरण दाखवा,” असे आव्हानही एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांना केले आहे.

- Advertisement -

जेव्हा पासून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, तेव्हा पासून त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे कायमच त्यांनी याचे खापर फडणवीसांवर फोडले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा कलगीतुरा कायमचं पाहायला मिळतो. पण आता खडसेंच्या या गौप्यस्फोटाला देवेंद्र फडणवीस नेमके काय उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – Kolhapur Voilence : शांतात राखा, कोल्हापूर राड्यावरून शरद पवारांचे जनतेला आवाहन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -